पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ मराठी अर्थ – [ एकमेकांस तदत करण्याकरितां ] एकत्र झालेल्या ( समिताः ) [ परंतु तुझ्याकरितां] यज्ञ न करणाऱ्या ( अयज्यवः ) दहा राजांना, हे इन्द्रावरुणहो !, सुदास् [ राजा वर प्रहार करितां आला नाहीं ( न युयुधुः ). [ यज्ञाचे ] नेते ह्म० यज्ञाचें काम धुरीणत्वाने करणारे (तृणां ) जे ऋत्विज यांची स्तुति [ त्या वेळी ] सफल [ झाली ] आणि ज्यांमध्ये देवांना हांका मारली जाते अशा ह्यांच्या यज्ञांमध्ये ( एषां देवहूतिषु [ तुमच्या कृपे- मुळें ] देव आविर्भूत होतात ( देवाः अभवन् देवाः प्रादुर्भवन्ति ) ऋचा ८वी.- दाशराज्ञे दशभिः राजभिः दशशब्दस्य छान्दसः दीर्घः. विभक्तिव्यत्ययः. परियत्ताय = परिवेष्टिताय. विश्वतः सर्वतः . अशिक्षतम्-वलं प्रायच्छतम्. श्वित्यंच: श्वितं वैलं नैर्मल्यं अञ्चतः गच्छन्तः. यत्र = यस्मिन्देशे. नमसा हविर्लक्षणेन अनेन. कपर्दिन:=जटिला.. धिया=स्तुला. धीवन्तः=कर्मभिर्युक्ताः. असपन्त = पर्यचरन्. तृत्सवः = वसिष्टशिष्याः एतत्संज्ञाः ऋत्विजः . मराठी अर्थ - निर्मलपणाने वागणारे ( श्रित्यंचः = श्रत्यं नैर्मल्यं अचंतः गच्छन्तः ), जटा धारण करणारे ( कपर्दिनः ), यागादि कर्मे आचरणारे ( धीवन्तः ) असे जे तृत्सु [ ह्या नांवाचे वसिष्टशिष्य ऋत्विज ] त्यांनी ज्या प्रदेशामध्यें ( यत्र ) [ हवीरूप] अन्नानें [व] स्तुतीनें तुमची सेवा केली