पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ ऋचा ४ री:-- वधनाभिः = वधकरैः आयुधैः. अप्रति= अप्रतिगतं, अप्राप्तं. भेदं = एतत्संज्ञं सुदासः शत्रुं, भेद नामें सुदास् राजाच्या शत्रूला. वन्वन्ता=हिंसन्तौ. सुदासं=शोभनं ददातीति सुदाः एतत्संज्ञं मम याज्यं राजानं. प्रावतं = प्रकर्षेण अरक्षतम्. ब्रह्माणि= स्तोत्राणि. एषां = एषां तृत्सूनां. शृणुतं =अशृणुतम्. हवीमनि=आहूयन्ते अस्मिन्युद्धार्थं परस्परमिति हवीमा संग्रामः तस्मिन्. सत्या= सत्य आलें फल जीचें अशी, सत्यफला. तृत्सूनां = एतत्संज्ञानां मम याज्यानां. पुरोहितिः = पुरोधानं, पौरोहित्यं. O मराठी अर्थ - हे इन्द्रावरुणहो ! वध करण्याला समर्थ अशा ( वध- नाभिः ) [ शस्त्रांनीही न आटोपलेला हा आटोक्यांत न आलेला ( अप्रति= अप्रतिगतं, अप्राप्तं ) जो भेद [ नांवाचा सुदास् राजाचा शत्रु ] त्याला मारून ( वन्वन्ता ) तुह्मी सुदासाचें फार रक्षण केलें होतें ( सुदासं प्रावतं ). ह्या [ तृत्सूची ] स्तोत्रे (ब्रह्माणि ) तुह्मीं युद्धाचे वेळी ( हवीमनि संग्रामे ) ऐकिली होती (अमृतं ). [ आणि ह्मणून भी करीत असलेले ] तृत्सूचें पौरोहित्य सफल झालें ( पुरोहितिः सत्या अभवत् ) . ऋचा ५ वी:- अभ्यातपन्ति = अभितो बाधन्ते. मा=मां.