पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० ऋचा २री:- नरः मनुष्याः. समयन्ते= [ युद्धार्थे ] संगच्छन्ते. कृतध्वजः = उच्छ्रितध्वजाः, आपापली निशाणें उभारून. आजा आजी. किं चन -- चनेति निपातद्वयसमुदायो विभज्य योजनयि:. " चन" पैकीं " च " हें " किं" बरोबर घ्यावे व " न " हैं " भवति " बरोबर घ्यावें. किं च = किमपि. भवति. प्रियं=अनुकूलं. किं च न प्रियं भवति किमपि अनुकूलं न भवति, अधि तु सर्वे दुष्करं भयन्ते-बिभ्यति, भुवना=भुवनानि, भूतजातानि स्वर्दृशः=[ शरीरपातादृर्ध्वं ] स्वर्गस्य द्रष्टारो वीराः, ८८ " तुकाराम तात्यांचा पाठ वीता: असा आहे. त्याचा अर्थ " मृत झालेले लोक " असा आहे. तत्र = तादृशे संग्रामे. नः अधिवोचतम्=अस्मत्पक्षपातवचनौ भवतम्, आमच्या बाजूने बोल णारे व्हा. मराठी अर्थ - ज्या [ युद्धा ] मध्ये ( यन्त्र ) [ आपापली ] निशाण उभारून ( कृतध्वज: ) मनुष्यें ( नरः ) [ लढण्याकरितां] एकमेकांना येऊन, भिडतात ( समयन्ते) अथवा एकमेकांना येऊन मिळतात ( समयन्ते ), ज्या युद्धामध्यें ( यस्मिन् आजा ) कांहीही अनुकूल [ गोष्ट ] घडत नाहीं ( किं च प्रियं न भवति ), ज्या [ युद्धा ] मध्ये [ सर्व ] प्राणिमात्र [व]