पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ मराठी अर्थ - [ लोकांनी] अबाध्य ( सत्या [ अन्यैः ] अबाध्या), पूजनीय अथवा गुणांनीं श्रेष्ठ (महती), दीप्तिमान् (देवी) [आणि] यज्ञ करण्यास योग्य ( यजता) अशी [ उषा ], अवाध्य ( सत्येभिः), पूजनीय * (महद्भिः ) अथवा गुणांनी श्रेष्ठ (महद्भिः ), दीप्तिमान् (देवेभिः ) [ आणि ] यज्ञ करण्यास योग्य ( यजत्रैः ) अशा [ किरणांसहवर्तमान अथवा देवां] सह- वर्तमान होत्साती, अत्यन्त स्थिर अशा ( इळ्हानि ) [ तमाचा ] भेद करिते ( रुजत् = भिनत्ति ) आणि गाईच्या [ संचाराला अडचण पडूं नये ह्मणून ] ( उत्रियाणां ) [ त्यांना प्रकाश ] देते ( ददत्) अथवा [ आपल्या स्तोत्यांना ] गाई ( " उत्रियाणां " हैं पद उत्रियाः गाः ह्या अर्थी घ्यावें ) देते ( ददत् ). गाई [ आदिकरून सर्व प्राणी ] उबेला इच्छितात (उषसं प्रतिवावशन्त ) ह्म० उषेच्या आगमनाची इच्छा करितात. 'उत्रियाणां " ह्या पदाचा जर षष्टीप्रमाणेच अर्थ केला तर " संचाराय " हे किंवा ह्या अर्थी एकादें पद अध्याहृत व्यावे लागून शिवाय " ददत्" ह्या क्रियापदाला एका कर्मही अध्याहृत घ्यावे लागतें. बरें, जर कांहीं अध्याहृत घेऊ नये असे हाटलें तर "उखियागां" ह्या पटयन्त पदाचा द्वितीयान्त पदाप्रमाणें अर्थ करणें प्राप्त होते. ऋचा ८ वी - तु-क्षित्रं. गोमत्= बहुभिगोभिर्युक्त. वीरवन= वीरैः पुत्रैः उपेतं. बेहि=देहि. रत्वं रमणीयं धनं. अश्ववत् = बहुभिः अवैः उपेतं.