पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ विषते=परिचरते. मराठी अर्थः- द्योतमान अशा ( धुतानां ) उषेला (उपसं ) वाहून नेणारे ( वहन्तः ), दीप्तिमान ( अरुषासः ) [व] पूज्य ( चित्रा:= चायनीया: ) असे अश्व दिसत आहेत ( अन् प्रतिदृश्यन्ते ). [ ही ] दीप्यमान (शुभ्रा ) अशी [ उपा ] नानारूपांनी मंडित अशा रथांत बसून ( विश्वपिशा रथेन ) [ सर्वत्र ] जाते ( याति ) [ आणि आपली ] परिचर्या करणाऱ्या ( विधते ) लोकांना (जनाय ) रमणीय धन (रत्नं ) देते ( दधाति ). ऋचा ७ वी. सत्या = अन्यैरबाध्या. हें उपेचें विशेषण आहे. उषा अध्याहृत आहे. सत्येभिः=सत्यैः. “ किरणैः " अथवा "देवैः " हा शब्द अध्याहृत घ्यावा व सर्व तृतीयान्त विशेषणांचा अन्वय त्याचेवरोबर करावा. नहती= पूजनीया, प्रवृद्धा वा गुणैः . देव= द्योतमाना. देवेभिः=देवैः • यजतान्यजनीया, यज्ञ करण्यास योग्य. यजत्रैः=यजनीयैः . रुजतू = भिनत्ति. हळानि = अयन्तं स्थिराणि तमांसि ददत्= ददाति उस्रियाणां = गोनाम एतत् उस्राविण: आसां भोगाः इति तद्वयुत्पतिः तासां, ज्यांच्या शरीरापासून [ दुधाचा ] स्राव होतो त्या गाईच्या. गावः – उपलक्षणमेतत्. सर्वेपि तमोऽवरुद्धाः प्राणिनः इत्यर्थः विशेषेण गवां प्रभाते संचारार्थ उपसः अपेक्षितत्वात् तासां प्राधान्येन उक्ति:. प्रतिवावशन्त = उशन्ति, कामयन्ते.