पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११५ मराठी अर्थ - बहुत अन्न देणारी ( वाजिनीवती ), विचित्र धनांनी युक्त ( चित्रामघा ) [आणि] सूर्याची पत्नी ( योषा ) [ जी उषा ] तिचें स्वामित्व धनावर ( राय: ) [ व देवमनुष्य आदिकरून सर्वांच्या ] संपत्तीवर ( वसूनां ) अथवा, ज्यांच्या योगानें [ लोकांचा आपापल्या घरचा ] वास सुखकर होतो असे जे रश्मि त्यांच्यावर ( वसूनां ) [ सुद्धां ] आहे ( ईशे = ईष्टे ). [ जरी " वाजिनीवत अथवा “ चित्रामघा " ह्या दोन शब्दांपैकी कोणत्या तरी एका शब्दाचें, त्याचा यौगिक अर्थ न घेतां, नुसतें "उषा" ह्या शब्दानें भाषान्तर करणें वाईट नव्हतें, तरी येथे दोन्ही शब्दांचें यौगिक अर्थातच भाषान्तर केलें आहे ]. ऋषींनी स्तवन केलेली ( ऋषिष्टुता ), [ प्राणिमात्रांना ] जरा आणणारी [व] धनानें संपन्न अशी ( मघोनी ) उषा, [ यागादि कमैं ] सांगतेस पोचविणारे जे [ यजमान ] ( वदिभिः ) त्यांनी स्तुत होत्साती (गृणाना=स्तूयमाना ) प्रभात करिते ( उच्छ- ति-विभातं करोति ). ऋचा ६ वीः- — घुतानां = द्योतमानां. हे उषेचें विशेषण आहे. अरुषासः = आरोचमानाः, दीप्तिमन्त. हें अश्वांचे विशेषण. चित्राः = चायनीयाः. अदृश्रन्- प्रतिदृश्यन्ते. वहन्तः = धारयन्तः. याति = सर्वत्र गच्छति. शुभ्रा = दीप्यमाना. विश्वपिशा=बहुरूपेण, नाना रूप धारण करणाया. दधाति ददाति. रत्नं रमणीयं धनं.