पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ (पराकात् ) [ जग प्रकाशित करण्याचा ] उद्योग करणारी ( युजाना ) ही ती प्रसिद्ध (एषा स्या ) उषा, लोकांच्या (जनानां ) सुज्ञपणाची कृत्यें ( वयुना = प्रज्ञानानि ) [ अथवा अज्ञपणाची कृत्यें ] साक्षित्वानें अवलोकन करीत ( अभि- पश्यन्ती ) एकदम (सद्यः ) पांचही वर्णीच्या लोकांना (पंच क्षितीः ) वेधून. टाकिते ( परिजिगाति=परिगच्छति ). ऋचा ५ वी:-- वाजिनीवती बन्ना. जरी हैं उषेचेच एक नांव आहे, तथापि चित्रामघा ह्या आणखी एका दुसऱ्या उषेच्या नांवाचा ह्याच वाक्यांत उपयोग केला असल्यामुळे ह्यांपैकी कोणा तरी एकाचा यौगिक अर्थ ध्यावा व एकाचा रूढ अर्थ घ्यावा. योपा= योषित्. चित्रामघा = विचित्रधना, विचित्ररश्म्याख्यधना वा. रायः = धनस्य [ अविशिष्टस्य तस्य ]. येथें कोणतेंही विशिष्ट धन घ्यावयाचें नाहीं. ईशे = ईष्टे. वसूनां=[ देवमनुष्यादिसर्वाश्रयाणां ] धनानां देवमनुष्यादि सर्वाजवळ जें जें धन असेल त्या सर्वाची [ उषा ही स्वामिनी आहे ]; अथवा वसवः वासकाः रश्नयः तेषां. ऋषिष्टुता = ऋषिभिः स्तुता. जरयन्ती = [ प्राणिजातानि ] जरयन्ती, प्राणिमात्रांना जरा आणणारी. उषाः खलु पुनः पुनरावर्तमाना प्राणिनां आयुः क्षपयति. मघोनीधनवती. उच्छति विभातं करोति. वह्निभिः=कर्मवोढुभिः यजमानैः . गृणाना स्तूयमाना.