पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ मराठी अर्थ - जो [ अत्रि ] तुह्मांला प्रिय असून ( प्रियः सन् ) तुम- च्याच रक्षणाखालीं आहे ( वां ओमानं दधते ) त्या अत्रीपासून ( अत्रये = एतन्नामकात् ऋषेः ) त्याचे [ खडकावरील ] निवासस्थान ( महिष्वन्तं ) निराळे करा (नियुयोतं=पृथकुरुतम् ) ह्म० त्याला त्या बंदिवासांतून सोडवा. ऋचा ६ वी : ही ऋचा अवघड आहे. उत-अपि च. त्यत्तत्. हैं " प्रतीत्यं " ह्याचें बरोबर घ्यावें लागतें. वां = युवयोः [ कर्म कुर्वते ], तुमच्या [ प्रीत्यर्थ यागादि कर्मे करणाऱ्या ]. जुरते=जूर्णाय, वृद्ध अशा. हें च्यवानाचे विशेषण. अश्विना=अश्विनौ. भूत्=अभूत्. च्यवानाय= एतन्नामकाय महर्षये. च्यवानाय त्यत्प्रतीयं भूत्=च्यवानाय महर्षये [ तस्य रूपस्य प्रत्याप्त्यै । तत्प्रतिगमनं अभूत्, [[ त्याच्या रूपाचा त्याला परत लाभ व्हावा ह्मणून ]च्यवान महर्षी प्रत तं प्रतिगमन घडले [ की जे इ. इ. ] यत् = ह्याचा पहिल्या चरणांतील " यत् " शी संबंध आहे. वर्ष:=रूपं. इतिऊति = इतोगमनाख्यं, मृत्योः सकाश तू इतः प्राप्तिरूपं, मृत्यूपसून आलीकडे येणें हैं ज्याचे स्वरूप होते असे. हे वर्षाचे विशेषण. अधिधत्थः =अध्यधत्तम्. 66 युवं च्यवानं अश्विना जरन्तं पुनर्युवानं चक्रथुः शचीभिः " इत्यादिषु च्यवानस्य युवयोः नवीकरणं प्रसिद्धम् वृद्ध झालेल्या व्यवानाला अश्विनांनी पुन्हां तरुण केलें होतें.