पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजांसि = लोकान्. १०४ शतोतिः=अपरिमितास्मद्विषयरक्षण: ( शतऊतिः ), जो आमचें शेंकडों पट ह्म० शेकडो रीतींनी रक्षण करितो. अस्मभ्यं=अस्मदर्थं. सूर्यावसू=सूर्यायाः सहरथे वसन्तौ. इयानः = याच्यमानः मराठी अर्थ - सूर्येबरोबर जे एका रथांत बसतात ते हे अश्विनहो ! ( सूर्यावसू अश्विना ) ! आह्मी आपल्या स्वतःकरितां ज्याची [ आमच्याकडे येण्याबद्दल ] प्रार्थना करितो आहोंत ( अस्मभ्यं इयानः ), ज्याच्या योगानें आमचें शेकडो तऱ्हेनें रक्षण होते ( शतोतिः ) [व] ज्याची गति मना- इतकी शीघ्र आहे ( मनोजवाः ) असा तुमचा रथ लोकांना ओलांडून ( तिरः = तिरस्कृत्य, अतिक्रम्य ) आहे ( प्रइयर्ति=आगच्छति ). ऋचा ४ थी :- ( वां रथः ) [ अखिल ] [ आमच्या यज्ञार्थ ] येत अयं - ह्याचा अन्वय " अद्रिः " ह्या पदावरोवर आहे. ह ह इति पूरण: . यत् = यदा. वां==युवां प्रति. देवयाः=देवौ युवां कामयमानः, तुह्मी जे देव त्या तुमच्या आगमनाची इच्छा करणारा. उ= उ इति पूरणः. अद्रि:- अभिषवग्रावा. ऊर्ध्वः=उन्नतः सन्. विवक्ति= उच्चैः शब्दयति.