पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ इच्छिण्यास योग्य ( वरं ) असे जे आमचें [ धन ], तें प्राप्त झालें असतां रक्षण करण्याचे कामी ( क्षेमे ) आणि प्राप्त झाले नाहीं तोंपर्यंत मिळविण्याचे काम ( योगे ) त्याची तूं काळजी घे ( पाहि ). आमचे कल्याण करून ( स्वस्तिभिः ) तू ( यूयं ) आमचें सर्वदा पालन कर ( नः सदा पात ). ऋचा १ ली: मंडल ७ सूक्त ६८. ( पीटर० नं० २१ ) शुभ्रा = दीप्तो. हे अश्विनांचे विशेषण, हें संबोधनाचें द्विवचन आहे. आयातम् = आगच्छतम्. अश्विना=अश्विनौ. स्वश्वा = शोभनाश्रौ. गिरः=स्तुतीः. दस्रा= [ शत्रूणां ] उपक्षपयितारौ. जुजुषाणा - सेवमानी. ह्याच्यापुढे " भवतम् " हैं क्रियापद अध्याहृत आहे. युवाकोः=युवां कामयमानस्य [ मम ]. हव्यानि हवींषि प्रतिभृता=संभृतानि. वीतं भक्षयतम्. मराठी अर्थ - दीप्तिमन्त ( शुभ्रा ) [व] सुंदर अश्वांनी युक्त असे (स्ववा) हें अश्विन हो ! [ आमच्या यज्ञांत ] या (आयातम् ). हे [ शत्रूंचे | नाशक हो ! तुमच्या [ आगमनाची ] कामना धरणारा जो [ मी ] त्यांच्या ( युवाकोः ) स्तोत्रांचे ( गिरः, द्वितीया विभक्ति ) [ तुह्मी ] स्वीकार करणारे ( जुजुषाणा ) [ व्हा ] आणि आह्मी अर्पण केलेले ( प्रतिभृता) हवि (हव्यानि ) [ तुह्मी ] भक्षण करा (वीतं. )