पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रतिजुषस्व = सेवस्व. १०१ मराठी अर्थ - हे गृहाचें पालन करणाऱ्या देवा ( वास्तोष्पते ! ) [ तूं ] आमचे वर्धन करणारा [व] आमच्या धनाचें वर्धन करणारा ( गयस्फानः ) हो (एधि ). हे चन्द्राप्रमाणे आह्लाद देणान्या ( इन्दो ) ! [ आमचें ] तुझ्याबरोबर सख्य राहून ( ते सख्ये ) [ आह्मी आपल्या ] गाईसहवर्तमान [व] अश्वांसह- वर्तमान (गोभिः अवेभिः ) जरेपासून मुक्त ह्म० विनाशरहित होऊं ( अजरासः स्याम ). ज्याप्रमाणें पिता हा पुत्राची [ रक्षणरूप ] सेवा करितो त्याप्रमाणे [ तूही ] आमची [ रक्षणरूप ] सेवा कर ( नः प्रतिजुषस्व ). ऋचा ३ री:- शग्मया= सुखकर्या. ते संसदा त्वया देयया संसदा. संसदा = स्थानेन.. सक्षीमहि = [ वयं ] संगच्छे महि. रण्वया = रमणीयया. गातुमत्या=धनवत्या. क्षेमे = प्राप्तस्य रक्षणे. योगे अप्राप्तस्य प्रापणे. वरं=वरणीयं [ धनं ] “ धनं " अध्याहृत. यूयं =लं. पात = पाहि. स्वस्तिभिः=कल्याणैः. मराठी अर्थ - हे गृहाचे पालन करणाऱ्या देवा ! सुखकर ( शग्मया ) रमणीय ( रण्वया ) आणि धनयुक्त ( गातुमत्या ) असें जें स्थान ( संसदा ) तूं आह्मांला देशील ( ते ) तेथें आह्मी जाऊन राहूं ( सक्षीमहि=संगच्छेमहि ).