पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० आहे. शं-सुखकरः. नः=अस्माकं, ह्याचा अन्वय " द्विपदे " आणि " चतुष्पदे द्विपदे = पुत्रपौत्रादिजनाय. चतुष्पदे=गवाश्वादिपशवे. " ह्यांकडे मराठी अर्थ - हे गृहाचें पालन करणाऱ्या ( वास्तोष्पते ) [ तुझे स्तोते जे आह्मी त्या ] आह्मांकडे ( अस्मान् ) [ तुझी कृपायुक्त ] नजर ठेव ( प्रतिजा- नीहि =प्रबुध्यस्व ). आमच्याकरितां (नः) निवेश ह्म० निवासस्थान सुखकर करणारा (स्वावेश:) [ व ] रोग उत्पन्न न करणारा (अनमीव: ) असा [ तूं ] हो ( भव). जें [ धन ] आह्मी तु ह्म० तुजजवळ मागतों ( यत्त्व ईमहे ) तें [ धन ] ( तत्) आह्मांला (नः) दे ( प्रतिजुषस्व = प्रयच्छ ). आम- च्या ( नः ) पुत्रपौत्रादिकांना ( द्विपदे ) [व] धेनु अश्व इत्यादि पशूंना ( चतुष्पदे ) [ तूं ] सुखकर ( शं) हो ( भव ). ऋचा २ री . वास्तोष्पते गृहस्थ पालयितर्देव. प्रतरणः = प्रवर्धकः, वर्धन करणारा. नः=अस्माकं, आमचें. एधि=भव. गंयस्फान:=गयस्य अस्मदीयस्य धनस्य स्फाययिता प्रवर्धकः. अश्वेभिः=अश्वैः. इन्दो - सोमवत् आह्लादक. अजरासः=जरारहिताः, विनाशरहिताः इयर्थः. ते सख्ये त्वया सह सख्ये सति. पितेव पुत्रान् = यथा पिता पुत्रान् रक्षकत्वेन सेवते तथा.