पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ मराठी अर्थः- ज्या [जला ] मध्ये [ त्या जलाचा स्वामी ] वरुण चास करितो, ज्यामध्यें सोम वास करितो, ज्यामध्ये [ राहून ] सर्व देव (विश्वे देवाः ) [ हवीरूप ] अन्नाचें आनंदानें सेवन करितात, [व] ज्यामध्यें • वैश्वानर जो अग्नि तो प्रविष्ट झाला आहे त्या जलात्मक देवता ( आपो देवीः ) ह्या प्रदेशामध्यें ( इह ) [ असणारा जो मी त्या ] मा रक्षात अथवा सजत प्राप्त होवोत ( मां अवन्तु. ) ऋचा १ ली:- मंडल ७ सूक्त ५४. ( पीटर नं. २० ) वास्तोष्पते= गृहस्य पालयितदेव, गृहाचे पालन करणाऱ्या देवा. प्रतिजानीहि =प्रबुध्यस्व [ आमची ] ओळख ठेव, [ आमच्याकडे ] नजर असू दे. करणारा. अस्मान्=अस्मान् त्वदीयान् स्तोतॄन्. स्वावेशः=शोभननिवेशः, आमचें निवासस्थान शोभन ा० सुखकारक अनमीवः=अरोगकृत्, रोग उत्पन्न न करणारा. नः=अस्माकं. यत् हैं धनाचें संबंधि सर्वनाम आहे. " धनं " हें पद अध्याहृत आहे. त्वात्वां, तुला. ईमहे याचामहे. तत् तत् धनं. न:- अस्मभ्यं, आह्मांला. प्रतिजुषस्व = प्रयच्छ, दे