पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ मराठी अर्थ - जें जल [ पर्जन्यरूपानें ] अन्तरिक्षामध्ये उत्पन्न होतें, (दिव्याः ), शिवाय ( उतवा ) जें [ नदी इत्यादि रूपानें] वाहतें ( स्रवन्ति ); [ जें जल ] खणल्याच्या योगानें उत्पन्न झालेलें आहे ( खनित्रिमा: ) व शिवाय जें आपोआपही उत्पन्न झालें आहे ( स्वयंजा: ) – असें [ सर्व प्रकारचें जल ] कीं, ज्या [ सर्वाचें ] शेवटचें जाण्याचें स्थान समुद्र हा आहे, जें [ सर्व ] दीप्तिमान् आहे [व] जें सर्व [ सगळ्या विश्वाला ], पवित्र करितें या जलात्मक देवता इ. इ. ऋचा ३ री:- यासां यासां अपां राजा= स्वामी. याति=गच्छति. मध्ये = मध्यम लोके. अवपश्यन् जानन् . जनानां प्रजानां मधुश्चुतः = रसं क्षरन्त्यः. शुचयः = दीप्तियुक्ताः. पावकाः = शोधयित्र्यः. मराठी अर्थः- लोकांची (जनानां ) खरेपणाचीं व खोटेपणाचीं जीं कृत्यें (सत्यानृते ) त्यांचे ज्ञान करून घेत घेत (अवपश्यन् ) ज्या [ जलाचा ]- राजा वरुण मध्यलोकामध्ये ( मध्ये) गमन करितो ( याति), जें माधुर्यानें आहे (मधुश्रुतः), जें दीप्तिमान् आहे [व] जें [ सगळ्या विश्वाला ] पवित्र करितें ( पावकाः ) त्या जलात्मक देवता इ. इ. युक्त ऋचा ४ थी :- ऊर्जे=अनं.