पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जनिष्ठा:= अजनिष्टाः, अभवः. ९३ अषाहु:=[ शत्रुभिः ] अनभिभूतः. मराठी अर्थ - हे बलवन्ता ( शवसिन्) इन्द्रा ! जेव्हां (यत्) [ तूं ] ऋषींच्या स्तोत्रांचे रक्षण करिशील ( ब्रह्म पासि ) ० स्तोत्रांचे फल देशील [ तेव्हां] तुझा महिमा तुझे स्तवन करणाऱ्या पुरुषाला ( हवं ) व्यापून टाको. जेव्हां (यत्) हे उग्रा (उग्र )! [तूं] हस्तामध्यें [ आपलें ] वज्र धारण करि- तोस (आदधिषे ) [ तेव्हां शत्रुवधासारख्या आपल्या ] कर्माच्या योगानें (क्रत्वा ) [ तूं ] घोर दिसावयास लागून ( घोरः सन् ) [ शत्रूंनीं ] जिंकण्यास अशक्य झालास ( अजनिष्ठा:- अभवः ). ऋचा ३ री - प्रणीती = प्रणीत्या, प्रणयनेन. जोहुवानान्=भृशं स्तुवतः यत् = यः त्वं. नृन्नरांना. न - मोक्ष मूलरनें “ न ” अजीबाद गाळला आहे. पीटर्सनच्या प्रतीत तो दिला आहे परंतु त्याचा अर्थ दिलेला नाहीं. तुकाराम तात्यांच्या प्रतीत " " 'नृन स्तोतॄन् इव " असें झटलें आहे. हे " न ” चे कोडें मोठें दुर्बोध आहे. त्याचा अर्थ काय करावा हें समजत नाहीं. रोदसी= द्यावापृथिव्यौ. संनिनेथ = संगमयसि. जोहुवानान् नॄन् रोदसी निनेथ = स्तोतॄन् द्यावापृथिव्यौ संगमयसि, दिवि पृथिव्यां च स्तोतॄन् प्रतिष्ठापयसीत्यर्थः . महे= महते. क्षत्राय = धनाय, रयिः क्षत्रं इति धननामसु पाठात्.