पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ ऋचा ६ वी:- पूषणं = पोषकं देवं. उद्युवामहे = उद्योजयामः. उद्योजनं आकर्षणं. अभीशून्=आश्वबन्धनार्थान् रश्मीन्, लगाम. सारथि:=सूतः. मयै महत्यै. स्वस्तये == रक्षार्थ. मराठी अर्थ -- ज्याप्रमाणें सारथि हा [ घोड्यांचा ] लगाम (अभीशून् ) उद्युक्त करितो ह्म॰ ओढतो त्याप्रमाणें [आमचें ] रक्षण चांगल्याप्रकारे करण्या- करितां ( मयै स्वस्तये ) [ आह्मी ] पूषाला व इन्द्राला उद्युक्त करितों (उद्यु- वामहे = उद्योजयामः ). मंडल ७ सूक्त २८. ( पीटर. नं० १८ ). ऋचा १ ली:- ब्रह्म-स्तोत्रं. नः अस्माकं. विद्वान् जानन्, ज्याला सर्व गोष्टी समजत आहेत असा [ जो तूं ]. अर्वाञ्चः =अस्मदभिमुखाः. ते = तव. हरयः =अश्वाः. विश्वे= सर्वे. ह्याचा अन्वय " मर्ताः " ह्या पदाबरोबर. चित् हि यद्यपि. त्वा=त्वां. विहवन्त= पृथक् हवन्ते.