पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

होते ह्यांत संशय नाहीं. वरील दोन्ही लेखांत ग्राह्य अंश किती आहे त्याचा विचार अर्थातच प्रत्येकानें आपापल्या मनाशीं करावा.
 मागें कांही दिवसांपूर्वी वेदांत सुरापान निषिद्ध होतें कीं नाहीं व सोमाला सुरा ह्मणतां येईल किंवा काय अशाविषयीं, कहीं एका कारणामुळे, कडाक्याचा वादविवाद चाललेला होता. दुसऱ्या प्रश्नासंबंधानें कांहीं अनुकूल किंवा प्रतिकूल लिहिण्याचा येथें विचार नाही. परंतु सातव्या मंडलांतील वरुणाच्या संबंधाच्या ८६ व्या सूक्तांतील सहाव्या ऋचेवरून वेदांत सुरापानाचा निषेध होता असें ह्मणण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं. वेदकालीं सुरापान चालूं होतें की नाही व वेदकाली सुरापान निषिद्ध होतें कीं नाहीं हे अगदी दोन निरनिराळे प्रश्न आहेत व वरील ऋचा जो वाचील तो दुसऱ्या प्रश्नाचें अस्तिपक्षीयच उत्तर देईल ह्यांत शंका नाहीं. जुव्याप्रमाणें सुरेलाही वसिष्ठांनीं पातकांतच गणले आहे हे ह्या ऋचेवरून अगदी स्पष्ट आहे. हीच ऋचा प्रो. जिनसीवाले ह्यांनी आपल्या ह्मणण्याच्या पुष्टीकरणार्थ आणली होती.
 आणखी एका गोष्टीचा शेवटी विचार करून ही प्रस्तावना पुरी करू. सायणाचार्यासंबंधाने डा. पीटर्सनचे उल्लेख जे दुसरीकडे दिले आहेत त्यांवरून डा. पीटर्सनला सायणाचार्याविषयी किती मत्सर वाटत असावा ह्या विषयीं कोणालाही सहज कल्पना होईल. "वृषा" ह्या शब्दाचें भाषान्तर भाष्यामध्यें जागोजागी "कामानां वर्षक:" असे केले आहे. तथापि हट्टास पेटूनच की काय न कळे, जेथें तेथे त्याचें भाषान्तर "Bull" ह्म० "वृषभ" असे ह्या जॉन बुलनी केलेले आहे. परंतु ह्यामुळे पीटर्सनचें भाषान्तर अप्रयोजकपणाचें मात्र झाले आहे.
 हें एक असो. परंतु एका ठिकाणचें भाषान्तर डा. पीटर्सननें अगदीच अक्षम्य केले आहे असें ह्मणण्यास कोणतीच हरकत दिसत नाहीं. तें स्थल ह्मटले ह्मणजे मं. ६ सूक्त ५५ ह्यामधील पांचवी ऋचा ही होय. वरील सूक्ता