पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८९ उपासदत् = उपसीदति, उपगच्छति. पातवे=पातुं. चम्वोः=अधिषवणफलकयोः, सोमरस पिळून काढण्याचे जे दोन काष्ठ- • फलक असतात त्यांमध्यें [ घालून ]. सुतम् = अभिषुतम्. करंभं=घृतसिक्तसक्त्वात्मकं हविः, घृतमिश्रित सातूंचा केलेला हवि. अन्यः=अनयोः [ इन्द्रापूष्णोः ] एकतरः पूषा. इच्छति=भक्षयितुं इच्छति मराठी अर्थ --- [ ह्या इन्द्रपूषांपैकीं ] एक [ जो इन्द्र तो ], दोन काष्ट- फलकांमध्यें ( चम्वोः ) घालून पिळून काढलेल्या ( सुतं ) सोमः [ रसाचें ] पान करण्याकरितां ( पातवे ) [ आमच्या यज्ञासमीप येतो ] ( उपासदत् ). [ त्यांपैकीं ] दुसरा [ जो पूषा तो ] हवीचें ( करंभं ) भक्षण करण्याची इच्छा दर्शित करितो ( इच्छति ). ऋचा ३ रीः- - अजाः छागाः. अन्यस्य=अनयोः इन्द्रापूष्णोः एकस्य पूष्णः. वह्नयः = वाहकाः, अश्वाः. हरी = एतत्संज्ञो अश्वौ. संभृता = संभृतौ, सम्यक् पुष्टौ . वृत्राणि शत्रून्. जिघ्नते- हन्ति. मराठी अर्थः- [ या इन्द्रपूषणापैकीं ] छाग झ० बोकड हे (अजाः ) एकाचे ह्म० पूषाचे ( अन्यस्य ) वाहक ( वह्नय: ) आहेत, [व] दुसऱ्याचे अन्यस्य ) पुष्ट असे हरिसंज्ञक दोन अश्व हे वाहक आहेत. त्या [ अश्वांच्या ] योगानें ( ताभ्यां ) [ इन्द्र हा ] शत्रूंचा संहार करितो ( वृत्राणि जिघ्नते. )