पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ मराठी अर्थ -- ज्यामध्यें पाप दूर राहतें ह्म० ज्यामध्ये पातकाचा विटाळही होत नाहीं ( आरेअघां ) [व] ज्यामध्यें धनाची प्राप्ति होते ( उपावसुं ) अशा तुझ्या संरक्षणाची ( ते स्वस्तिं ), [ आह्मी आपल्या ] यज्ञाच्या [ सिद्धी ] करितां, अथवा [ आमच्या ] सर्व [ उपभोग्य ] पदार्थांची [ आणखी जास्त ] वृद्धि व्हावी ह्मणून, आज आणि उद्या ह्म० सर्वकाल इच्छा करितों ( आईमहे ). ऋचा १ ली:- मंडल ६ सूक्त ५७. ( पीटर नं. १७ ). . पूषणा- इतरेतरयोगादिन्द्रपूषन् शब्दयोः उभयत्र द्विवचनं. एकमेकांच्या अपेक्षेनें “ इन्द्र " आणि " पूषन् " त्या दोन शब्दांपैकीं प्रत्येकाचें द्विवचन घातलें आहे. नु-अद्य. सख्याय = सखित्वाय, [ तुमचा ] स्नेह संपादितां यावा ह्मणून. स्वस्तये=शोभनाय. हें सख्याचें विशेषण आहे. हुवेम=आहुयाम, स्तवाम वा. वाजसातये = वाजस्य अन्नस्य बलस्य वा सातये संभजन- मराठी अर्थ–हे इन्द्रपूषणहो ! [तुमचा ] कल्याणकारक ( स्वस्तये ) असा स्नेह संपादितां यावा (संख्याय ) [व] [ आह्मांला ] अन्नाचा अथवा बलाचा उपभोग घेण्यास सांपडावा ( वाजसातये ) ह्मणून आह्मी [ तुझांला ] हांक मारितों ( हुवेम ) अथवा, [तुमचें ] स्तवन करितों (हुवेम ). ऋचा २री:- अन्यः-अनयोः [ इन्द्रापूष्णोः ] एकतरः इन्द्रः.