पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८७ मराठी अर्थ - बहुत लोक ज्या [ तुझी ] स्तुति करितात (पुरुष्टुत ), जो [ तूं ] दर्शनीय ह्म० सुन्दर आहेस [व] जो [ तूं फार ज्ञानवान् आहेस ( मन्तुम: ) अशा [ हे पूषा !] जें [ धन प्राप्त व्हावे अशी इच्छा मनांत धरून आह्मी ] तुझी स्तुति करूं (त्वा वाम त्वां स्तवाम) तें आमचें इच्छित (तत् नः मन्म ) [ धन ] पुष्कळसें ( सु-सुष्ठु . अव्यय ) उत्पन्न कर ( साधय = उत्पादय ). ऋचा ५ वी. इमं - ह्याचा अन्वय “गणं " ह्याबरोबर करावा. नः अस्माकं. गवेषणं=गवां एषयितारं. सातये -लाभाय. सीषधः = साधय. आरात्=दूरदेशे [ अपि ]. श्रुतः= विश्रुतः, प्रख्यात:. मराठी अर्थ - [ हे पूषा ! ] आमच्या लाभाकरितां ह्म० आमचें कल्याण व्हावे ह्मणून ( नः सातये ) ह्या [ मनुष्य ] समाजाला ( इमं गण ) गाईंची इच्छा करणारा असा ( गवेषणं ) कर ( सीषधः = साधय ). हे पूषा! दूर देशां- मध्ये [ ही ] तुझी प्रख्याति झाली आहे ( श्रुतः असि ). ऋचा ६ वी- ते स्वस्ति = त्वया देयां कल्याणीं रक्षां तुझें कल्याणकारक रक्षण. आईमहे = अतियाचा महे. आरे अघां = आरे दूरे अयं पापं यस्याः तादृशी. उपावसुं = उपगधनां. " आरेअघां " व " उपावसुं " हीं दोन्ही स्वस्तीची विशेषणे आहेत. सर्वतातये=सर्वैः ऋत्विग्भिः तायते इति सर्वतातिर्यज्ञः तदर्थ, यद्वा सर्वेषां मोगानां विस्ताराय.