पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ परुषे =पर्ववति भास्वति वा, जो पर्वांनी अथवा प्रकाशानें युक्त आहे अशा. ह्याचा अन्वय " गवि " बरोबर. गवि गच्छतीति गौ: आदित्यः तस्मिन्. हिरण्ययं = हिरण्मयं सुवर्णनिर्मितं. न्यैरयत् - नितरां प्रेरयति स्म. , रथीतमः = अतिशयेन रथी नेतृतमो वा. मराठी अर्थ -- शिवाय [ सर्वांना स्वकर्माचे ठायीं ] प्रेरणा करणारा (सूरः ) [ आणि ] अतिशय शूर, अथवा रथ उत्तम चालविणारा अथवा [ लोकांचा ] उत्तम नायक ह्म० धुरीण किंवा मार्गदर्शक ( रथीतमः ) असा जो [ पूषा ] तो, पर्ववान् ह्म० पर्वांनी युक्त अथवा प्रकाशमान असा जो आदित्य ( पुरुषे गवि ) त्याचेवर, [ आपलें ] हें सोनेरी चाक ( अदः हिरण्ययं चक्रं ) चालवितो (न्यैरयत् ). पर्व ह्याचा अर्थ सांधा असा आहे. ऋचा ४ थी: - यत् = यदुद्धिश्य. पुरुष्टुत= बहुभिर्यजमानैः स्तुत. ब्रवाम = स्तवाम. दस्र = दर्शनीय. c मन्तुमः ज्ञानवन्. हें संबोधन असून पूषाचें विशेषण आहे. पूषन् " हें अध्याहृत आहे. तत् = तत् धनं, तें धन. सु-सुष्ठु. नः अस्माकं. मन्म- मननीयं. हे धनाचें विशेषण. " धनं " हें अध्याहृत आहे. साधय = उत्पादय.