पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ मराठी अर्थ - करम्भ • घृतमिश्रित यव आणि सक्त भक्षण करणारा (करम्भात्) ह्या नांवानें (इति) जो ह्या पूषाची स्तुति करितो ( एनं पूषणं आदिदेशति ) त्याला [अन्य] देवाची स्तुति करावयास नको ( न तेन देव आदिशे ). [ कारण ह्या पूत्रापासूनच सर्व इच्छित गोष्टी मिळण्याजोग्या आहेत. ] ऋचा २ री:- --- उत घ=अपि च. सः=यः शत्रूणां हन्तृत्वेन प्रसिद्धः तादृशः. रथीतमः = अतिशयेन रथी, महारथः, मोठा वीर. सख्या युजा - मित्रभूतेन पूष्णा सहायभूतेन युक्तः सन्. वृत्राणि शत्रून. जिघ्नते- हन्ति. सख्या युजा इन्द्रो वृत्राणि जिघ्नते - मित्रभूतेन पूष्णा सहायभूतेन युक्तः सन् इन्द्रः शत्रून्हन्ति, इन्द्रस्यापि अयमेव साहाय्यकारी इत्यर्थः सत्पति: सतां पालयिता. मराठी अर्थ -- [ शत्रुविध्वसंक ह्मणून ] प्रसिद्ध असलेला, अतिशय शूर (रथीतमः ) [व] सदाचरणी लोकांचें पालन करणारा ( सत्पतिः ) असा जो इन्द्र तो, त्याचा मित्र जो [ हा पूषा ] तो [ इन्द्राच्या साहाय्यार्थ येऊन इन्द्राला ] येऊन मिळाला तर [च], शत्रूंचा वध करितो ( वृत्राणि जिघ्नते ). '[ नाहीं तर इन्द्राला तें काम दुर्घट झालें असतें. ] ऋचा ३ री: -- लक्ष्यपूर्वक वाचावी. उत= अपि च. अदः तद्रथस्य [ चषं ] ह्म० हें पूषाच्या रथाचें [ चाक. ] सूरः=प्रेरकः हें पूषाचें विशेषण. त्याचप्रमाणे “रथीतमः " हेंही पूषाचेंच विशेषण आहे. " पूषा " हैं अध्याहृत घ्यावें.