पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ आमुचा कधीही ( कदा चन ) नाश होणार नाहीं ( न रिष्येम ). [ ते भाझी ] या यागसमयीं (इइ) तुझें स्तवन करितों (ते स्तोतारः स्मसि ). ऋचा १० वी :- षूषा – पोषको देवः परस्तात्= परस्मिन्देशे, [ सुसंचारात् ] अन्यस्मिन् [ चोरव्याघ्रादिभिरु षिते ] देशे, [ संचार करण्यास निर्भय असा हा प्रदेश सोडून चोरांचा व व्या- घ्रादिकांचा जेथें सुळसुळाट आहे अशा ] परक्या प्रदेशांत. त्याच्यापुढें “ गच्छतः गोधनस्य निवारणाय " हें अध्याहृत आहे. परिदधातु = परिधानं निवारकं करोतु. नष्टं हें गोधनाचें विशेषण आहे. " गोधनं " हें अध्याहृत आहे. आजतु= आगच्छतु, आगमयतु. पीटर्सनच्या पुस्तकांत “ आगमयतु " हें गाळलें आहे. मराठी अर्थ - [ संचार करण्यास निर्भय असा हा सोडून चोरांचा व व्याघ्रादिकांचा जेथें सुळसुळाट आहे अशा ] परक्या प्रदेशांत (परस्तात् ) [ जाणाऱ्या गाईंना आणखी पुढे भटकण्यास प्रतिबंध व्हावा ह्मणून, हा सर्व जगाचें ] पोषण करणारा पूषा [ आपल्या ] उजवा हात [ त्यांना ] निवारक करो ( परिदधातु = परिधानं निवारकं करोतु ). आमच्या चुकलेल्या ( नो नष्टं ) [ गाई ] पुन्हां [ घरीं ] येवोत. सायणाचार्य ओढून ताणून अर्थ करितात की काय हैं पहाण्यास ही ऋचा हैं एक उत्तम साधन आहे. ह्या ऋचेंत, मुळांमध्ये फार थोडें असून अध्याहृतच पुष्कळ घेतलेलें आहे, असें सत्कृद्दर्शनीं वाटतें. ह्मणून [ ] अशा कसाच्या बाहेर जे शब्द आहेत तेवढेच एकदा मुद्दाम वाचून पहावे व त्यांवरून सायं- णाचार्यांनी केलेल्या अर्थीचा बोध होतो किंवा नाहीं त्याची परीक्षा करावी.