पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ चा ८ वीः- शृण्वन्तं =अस्मत्स्तोत्राणि राण्वन्तं. इ= [ दारिद्र्यस्य ] प्रेरकं [ दारिद्र्याला घालवून देणारा ], [ दारिया नाहीसे करणारा. अनष्टवेदसं= अविनष्टधनम्. इशानं = [ सर्वस्य ] ईश्वरं. रायः =धनानि. ईमहे = याचामहे. ] मराठी अर्थ - जो [ आमचें स्तवन ] ऐकतो आहे (शृण्वन्तं ), जो [ दारिद्र्य ] घालवून टाकतो (इ), ज्याचें धन [ कधीही ] नष्ट होत नाहीं - ( अनष्टवेदसं ) [ व सर्व जगाचा ] जो ईश्वर आहे (ईशानं ) अशा [ ह्या ] पूषाला [ आह्मी ] धन मागतों (राय: ईमहे ). ऋचा ९ वीः- पूषन् = पोषक. व्रते - कर्मणि. ह्याच्यापुढे “ वर्तमानाः " हें अध्याहृत आहे. न रिष्येम = हिंसिताः न भवेम. कदा चन= कदाचिदपि . ते तव. इह = अस्मिन्कर्मणि. स्मसि = स्मः, भवामः . 1 मराठी अर्थ -- [ सर्वांचें ] पोषण करणाऱ्या पूषा | तुझ्या संबंधी [यागादिक ] कर्मै [ आचरणारे ] जे आह्मी ( तव व्रते [ वर्तमानाः ] वयं ) त्या