पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ .ऋचा ६ वी:- 1 मराठी अर्थ - हे पूषा ! [ सोमरस ] पिळणाऱ्या ( सुन्वतः ) यजमा- नाच्या गाई [ आदि करून पशूंच्या ] मागोमाग, [ त्यांच्या रक्षणार्थ ], जा ( गाः अनुप्रेहि ). आणि, [ तुझें ] स्तवन करणारे जे आह्मी त्यांच्याही गाई, [ आदि- करून गुरांच्या ] पाठोपाठ, [ त्यांच्या रक्षणार्थ ], जा. गाः पशून्. अनुप्रेहि=रक्षणार्थं अनुगच्छ. सुन्वतः = सोमाभिषवं कुर्वतः. हें यजमानाचे विशेषण, स्तुवतां=[ त्वद्विषयं ] स्तोत्रं कुर्वतां . उत=अपि च. ऋचा ७ वीः- आहे. - माकि: नेशत् =मा नश्यतु. माकी रिषत् = मा [ व्याघ्न्नादिभिः ] हिंस्यताम्. माकी केवटे संशारि= मा कृपे संशीर्ण भूतू, कूपपातेनापि हिंसितं मा भवतु. अरिष्टाभिः=अहिशिताभिः [ गोभिः ] सह. " गोभिः " हें अध्याहृत आगहि - [ सायंकाले ] आगच्छ. माकिमकीं इत्येतौ प्रतिषेधमात्रे वर्तेते. मराठी अर्थ - [ आमच्या गाई, रानामध्ये असतांना, ] नाश न पावोत ( माकिर्नेशत् ), [ व्याघ्रादिकांकडून त्या ] मारल्या न जावोत (माकी रिषत् ) [ [त्या] कृपांत [ पडून ] ( केवटे ) [ त्यांना ] मरण न येवो ( माकीं संशारि ). [ अशा रीतीनें त्यांच्या रक्षणाची काळजी घेऊन ] मग [ संध्याकाळी त्यांना ] सुरक्षित घेऊन (अरिष्टाभिः ) [ घरी ] ये ( आगहि )