पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ संचार करितात ( पतयन्ति ), ओषधि वाढीस लागतात ( उज्जिहते ), अंतरिक्ष ( स्वः) गळू लागतें ( पिन्वते = क्षरति ) [ आणि ] पृथिवी ही सर्व जगाचें हित करण्यास (विश्वमै भुवनाय ) समर्थ होते ( जायते.) ऋचा ५वी:- - व्रते - कर्मणि. 218 यस्य व्रते=ज्याच्या कृत्यानें, अथवा ज्याचे कृत्य चाललें असतांना. नन्नमीति=अत्यर्थं नमति, सर्वेषां अधो भवति. शफवत् = पादोपेतं गवादिकं. जर्भुरीति=भ्रियते, पूर्यते, गच्छतीतिवा. ओषधी:- ओषध्यः. विश्वरूपाः=नानारूपाः. त्याच्यापुढे " भवन्ति " हैं अध्याहृत आहे. महि = महत्. शर्म-सुखं. मराठी अर्थ - ज्याच्या कृत्यानें (यस्य व्रते ) पृथिवी फार दबून जाते ( नन्नमीति ), ज्याच्या कृत्यानें, ज्यांना खुर आहेत असा [ गाईसारखा ] प्राणी ( शफवत् ) पुष्ट होतो अथवा पळू लागतो (जर्भुरीति = भ्रियते गच्छतीतिवा ), क्याच्या कृत्यानें ओषधि नाना रूपें धारण करितात ( विश्वरूपाः ) असा तूं जो श्रेष्ठ पर्जन्य तो तूं आह्मांला बहुत सुख (महि शर्म ) दे. ऋचा ६ वीः दिवः = अन्तरिक्षसकाशात्. नः=अस्मदर्थ. मरुतः = हें संबोधन आहे. ररीध्वं दत्त.