पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ चाबकाच्या योगाने (कराया ) आपल्या अश्वांना ह्म० मेघांना लवकर चालवून ( कशया अश्वान् अभिक्षिपन् ) [ पर्जन्य ] हा, वृष्टि करणारे ( वर्ष्यान् ) जे मेघ दूतान् दूतवत् वृष्टि प्रेरकान् मेघान् ) त्यांना, सर्वांच्या दृष्टीसमोर. आणितो ( आविष्कृणुते ). जेव्हां ( यत् ) पर्जन्य हा अंतरिक्षाला ( नभः ) वृष्टियुक्त ( वर्ण्य = वर्षेोपेतं ) करितो ( कृणुते ) तेव्हां [ अवर्षणाच्या योगानें जगताला ] त्रस्त करणाऱ्या अथवा गर्जना करणाऱ्या अशा [ मेघाच्या ] ( सिंहस्य ) गर्जना ( स्तनथा: ) फार दूरवरपासून ( दूरात्) बाहेर ऐकू येतात ( उदीरते= उदच्छन्ति. ऋचा ४ थी:-- पतयन्ति = गच्छन्ति, समन्तात्संचरन्ति. ओषधीः = ओषधयः. उज्जिहते = उद्गच्छन्ति, प्रवर्धन्ते. , पिन्वते=क्षरति स्वः=अंतरिक्षं, इरा = भूमिः, विश्वस्मै सर्वस्मै. भुवनाय = सर्वजगद्धिताय. जायते = समर्था भवति. यत् यदा. रेतसा- उदकेन. अवति- रक्षति, अभिगच्छति वा; रक्षण करितो अथवा अभिगमन करितो. मराठी अर्थ - जेव्हां पर्जन्य हा उदकानें. ( रेतसा ) पृथिवीचें पालन करितो ( अवति ) [ तेव्हां ] वायु वाहतात, विजा [ चोहोंकडे ]