पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा ५ वी. ६३ सुन्वते = सोमाभिषवं कुर्वते. हें यजमानाचे विशेषण. सुवीर्य = शोभनं बलं. आवह = प्रापय, प्राप्त करून दे. आसत्सि= आसीद. बर्हिषि = यज्ञे. मराठी अर्थ - हे अग्ने ! सोमरस पिळणाऱ्या [ यजमानाला ] ( सुन्वते ) चांगलें बल ( सुवीर्ये ) प्राप्त करून दे ( आवह = प्रापय ) [ आणि सर्व ] देवांसह ( देवैः ) [ ह्या ] यज्ञामध्यें ( बर्हिषि ) आसन्न ह्म० स्थानापन्न हो ( आसत्सि ). ( ऋचा ६ वी- होणारा. समिधान := [ हविर्भिः ] समिध्यमानः, [ हवींच्या योगानें ] प्रदप्ति सहस्रजित्=सहस्रस्य जेतः, सहस्रांना [ ही ] जिंकणाऱ्या संबोधन, धर्माणि: = [ नः ] कर्माणि, यज्ञादिक्रियाः पुष्यसि=पोषयसि. उक्थ्य:- प्रशस्य:, स्तुत्य: मराठी अर्थ - सहस्रांनाही जिंकणाऱ्या हे अग्ने ( सहस्रजित् अग्ने ) ! हवींच्या योगानें ] प्रदीप्त होणारा ( समिधानः समिध्यमानः )' [ आणि स्तुति करण्यास योग्य ( उक्थ्यः ) जो तूं तो देवांचा दूत असून [ शिवाय आमच्या यज्ञयागादि ] कर्माचे पोषण करितोस ( धर्माणि पुष्यसि ). ऋचा ७ वीः- -- जातवेदसं = जातानि भूतानि वेत्तीति जातवेदाः तं. अम्मीचे विशेषण. होत्रवाहं = होत्रस्य यज्ञस्य वोढारं यज्ञ सिद्धीप्रत नेणारा. यविष्ठयं = युवतमं, अगदी तरुण.