पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ निदधात = निधत्त, स्थापन करा. देव द्योतमानं. ऋत्विजं=ऋतौ यष्टारं, योग्य ऋतूचे ठायीं यजन करणारा. मराठी अर्थ -- सर्व भूतमात्रांना जो जाणतो ( जातवेदसं), यज्ञ जो ' सिद्धीप्रत नेतो (होत्रवाहं ), जो अगदी तरुण आहे ( यविष्ठयं ), जो दीप्तिमान् आहे (देवं ) [ आणि योग्य ] ऋतूचे ठायीं जो [ देवांना ] यज्ञ पोचवितो ( ऋत्विजं ) अशा [ ह्या ] अनीला [ कुंडामध्यें ] स्थापन करा ( निदधात ). ऋचा ८ वी:- - यज्ञः=यज्ञसाधनं हविः, यज्ञाला साधनीभूत जो हवि तो. प्रतु = [ देवान् ] गच्छतु, [ देवांप्रत ] जावो. आनुषक् = अनुषक्तं यथा भवति तथा, सतत, मध्यें खंड न पडतां. देवव्यचस्तमः=देवैः प्रकाशमानैः स्तोतृभिः व्याप्ततमः तेजस्वी जे स्तोते त्यांनी अर्पण केलेला. बर्हिः कुश. आसरे=[ अग्नेः ] आसदनार्थ, [ अम्मीला ] बसण्याकरितां. मराठी अर्थ -- तेजस्वी जे स्तोते त्यांणी अर्पण केलेला ( देवव्यच- स्तमः = देवैः प्रकाशमानैः स्तोतृभिर्व्याप्ततमः ) [ हा ] असा हवि (यज्ञः ) आज ( अद्य ) अनुषंगाने ह्म० मध्यें अशा रीतीनें (आनुषक् ) [ देवांप्रत ] जावो ( प्रैतु ). यज्ञाला साधनीभूत खंड न पडतां सतत [ हे ऋत्विजहो ! बह्म० कुश है [ अग्नीला ] बसण्याकरितां ( आसदे ) [ येथें ] पसरा ( स्तृणीत ). ऋचा ९ वी:- इदं इदं बर्हिः. मरुतः - मरुद्गणाः.