पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवेदिवे-प्रतिदिनं. सोभर्ग= सौभाग्यजनकं. आसुवन्ति = अभिषुण्वन्ति. नः अस्मभ्यं. ६० यंसत् यच्छतु. पहिल्या दोन ओळींचें “ सवासः " ह्या शब्दामुळे दोन अर्थ होतात. ते येणेंप्रमाणें. १ मराठी अर्थ- हे सवित्या जे यजमान रोजच्यारोज ( दिवेदिवे ) "तीन सवनानां अनुलक्षून ( सवास:- सवनानि [ प्रति ] ) दिवसांतून तीन वेळां (त्रिरहन ) सौभाग्यजनक असा सोम रस पिळतात ( आसुवन्ति ). २ मराठी अर्थ --हे सवित्या ! जे यजमान रोजच्यारोज ( दिवेदिवे ) दिवसांतून तीन वेळां (त्रिरहन् ) सौभाग्यजनक असा ( सौभगं ) सोमरस ( सवासः ) पिळतात. अंतिम दोन चरणांचा मराठी अर्थ --त्या आह्मांला (नः), इन्द्र, द्यावापृथिवी, सर्व जल [ देवतांसहवर्तमान ] सिन्धु आणि सर्व आदित्यांस. हवर्तमान अदिति सौख्य ( शर्म ), देवो ( यंसत् ). सावित्रे सूक्ते इन्द्रादीनां निपातभाक्त्वात् तेषां प्रार्थना न विरुध्यते. जरी हें सूक्त मुख्यतः सवित्याला उद्देशून आहे तरी त्यांत इन्द्रादिकांचा संबंध येत असल्यामुळे त्यांचीही प्रार्थना ह्यांत केली आहे. ऋचा १ वो:- मंडल ५ सूक्त २६९ ( पीटर. नं. ११ ) पावक शोधक, शुद्ध करणान्या ! रोचिषा - स्वदीप्त्या, आपल्या तेजानें.