पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ अत्र = अस्मिन्कर्मणि, ह्या यज्ञामध्यें. सुवतात्=अनुजानीहि. अनागसः - आपापान् . मराठी अर्थ - हे सवित्या ! तूं जो देव, त्या तुझ्यासंबंधानें (दैव्ये जने), [ तुझ्या शिवाय इतर ] देवांसंबंधानें ( देवेषु ) आणि मनुष्यांसंबंधानें ( मानुषेषु.) जो [कांहीं अपराध ] ( यत् ). [ आह्मी आपल्या ] दुर्बल [ अथवा ] वृद्ध अशा (दीनैर्दक्षैः) [पुत्रां] सहवर्तमान [ अथवा ऋत्विजां] सहवर्तमान बेसावधपणानें (अचित्ती ), ऐश्वर्यमदानं [ किंवा ] शरीरसामर्थ्याच्या गवनें ( प्रभूती, पुरुषत्वता ) केलेला आहे (चक्रम ) [ त्या ] अपराधापासून मुक्त होण्याची ह्या यज्ञामध्ये आह्मांला मोकळीक दे ( अत्र नः अनागसः सुवतात् ). ऋचा ४ थी - न प्रमिये न प्रमीयेत, न हिंस्येत, हिंसार्ह न भवति इत्यर्थः, नाश पाव- णार नाहीं. दैव्यस्य=देवस्य; यद्वा दैव्यस्य इति अधिकरणे षष्टी, साच कर्मार्था, दैव्यं [ कर्म ] इत्यर्थः. तत् तत् कर्म. " कर्म” हे अध्याहृत आहे. " दैव्यस्य" ह्याचा अन्वय " कर्मा "बरोबरच करावा; मग, त्याचा अर्थ " दैव्यस्य " अथवा " दैव्यं " ह्यां- पैकी कोणताही मानिला तरी हरकत नाहीं. धारयिष्यति = धारयति. पृथिव्याः वरिमन्=भूम्याः उरुत्वे, [ ह्या] विस्तीर्ण पृथिवीमध्यें. आ=आकारश्चार्थे. “आ " चा अर्थ " च " असा आहे. स्वंगुरिः=शोभनांगुल्युपलक्षितहस्त:. हैं सविल्याचें विशेषण.." सविता हा शब्द अध्याहृत आहे.