पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५ अत्र = अस्मिन्कर्मणि. aai= [ गवादिलक्षणं ] धनं. दधत्= दद्यात्. यथा दधत्——यथा दधत् तथा वन्द्यः उपवाच्यश्च अभूत्, असा अन्वय करावा. भाषांतरांत तिसरा चरण अगोदर घ्यावा. मराठी अर्थ - जो यजमानांना ( मानवेभ्यः ) रमणीय अशी धनें (रत्ना) वांटून टाकितो ( विभजति ) [ तो ] सविता देव [ ज्या अर्थी उगवला ( अभूत् ) [आणि] ज्या अर्थी ( यथा ) आह्मांला ( नः ) ह्या यज्ञामध्यें (अत्र) प्रशस्य असें ( श्रेष्ठं ) [ गवादिक ] धन ( द्रविणं ) [ तो, संतुष्ट झाल्यास कृपा करून, ] देईल ( दधत् ) [ त्या अर्थी ] आह्मी [ त्याला ] सत्वर (नु ) वन्दन केलें पाहिजे ( वन्द्यः [ भवति ] ) [व] ह्या यागकाली ( इदानीं ) दिवसाच्या ( अह्नः ) तृतीय ) सवनाचे वेळीं [ आमच्या ] होत्यांनी (नृभिः ) [ त्याचें ] स्तवन [ही ] केलें पाहिजे ( उपवाच्यः ). . ऋचा २ री:- विशेषेण. - हि = "हि" शब्दः प्रसिद्धौ. यज्ञियेभ्यः = यज्ञार्हेभ्यः. हें देवांचें विशेषण आहे. अमृतत्वं=अमृतत्वसाधनं, अमृतत्व प्राप्त करून घेण्याचे साधन. भागाचें सुवसि = अनुजानासि घेऊं देतोस. भागं-सोमाज्यादिलक्षणं भागं. उत्तमं= उत्कृष्टतमं. आत् इत् = अनन्तरं एव.. दामानं हविषां दातारं. व्यूर्णुषे=प्रकाशयसि.