पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ मराठी अर्थ - हें इन्द्रवायूहो ! ह्या यज्ञाकडे ( इह ) तुमचें ( वां) गमन (प्रा) होऊ द्या, [व] ह्या यज्ञामध्यें (इह) तुह्यांला सोमरसाचें पान करण्यास अवधि सांपडावा ह्मगून ( वां सोमपीतये ) [ तुमच्या अश्वाचंही ] विमोचन होऊं द्या ( विमोवनं अस्तु ). पीटर्सनचा पाठ पुढीलप्रमाणे आहे. पर्यवसानतः एकार्थत्वेपि आदरार्थत्वात् अवरोधः. ऋचा १ ली. मंडल ४ सूत्र ५४. ( पीटर. नं० १० ) अभूत् = प्रादुरासीत्, उगवला. वन्यः --- ह्याच्यापुढे “ भवति " हैं क्रियापद अध्याहृत घेतले पाहिजे. ह्मणजे पहिल्या चरणांत एकंदर दोन वाक्यें केली पाहिजेत. ती अशी- सविता देव : अभूत् [ अतः ] नु न: वन्द्यो [ भवति ]. - क्षिप्रमेव. नः अस्माकं. इदानीं = इदानीं यागकाले, आतां यागकाली. अह्नः - ह्याच्यापुढे “ तृतीये सवने" हैं अध्याहृत घ्यावें. अहः तृतीये सवने ह्म० दिवसांतील तिसऱ्या सवनाचे वेळी. सवन ह्म० यज्ञ. उपवाच्यः=स्तुत्यः. ह्याच्यापुढे “भवति " हैं अध्याहृत आहे. नृभिः=अस्मदीयैः होतृभिः. रत्ना = रमणीयानि धनानि मानवेभ्यः = मनोरपत्येभ्यः यजमानेभ्यः. श्रेष्ठ = प्रशस्यं. नः=अस्मभ्यं, आह्यांला.