पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" ५३ मराठी अर्थ -- हे इन्द्रवायू हो ! ज्याचें बल मोठें आहे अशा ( पृथु- पाजसा ) रथांत बसून ( रथेन ) [ हवि ] देणारा जो [ यजमान ] त्याचे सांनिध ( दाश्वांस ) या ( उपगच्छतम् ) [ आणि ह्मणून तुह्मी ] ह्या यज्ञाप्रत [ ही ] - आगमन करा ( आगतम् ). ऋचा ६ वी.- अयं = अयं सोमः. सुतः = अभिषुतः, पिळला आहे. तं तं सोमं. देवेभिः = देवै. सजोषसा= समानप्रीतौ सन्तौ, सारख्या रीतीनें संतुष्ट होत्साते. दाशुषः- हचिर्दातुः, हवि देणाऱ्याच्या [ अर्थात् यजमानाच्या ]. मराठी अर्थ - हे इन्द्रवायूहो ! हा ( अ ) [ सोमरस ] पिळला आहे. (सुतः). [ तुह्मी दोघे जण ] सारख्या रीतीनें संतुष्ट होत्साते (सजोषसा) [इतर] देवांसहवर्तमान ( देवेभिः ) हवि अर्पण करणाऱ्या [ यजमानाच्या ] ( दाशुषः ) यागशालेमध्ये (गृहे ), तो [ सोमरस ] ( तं ) प्या ( पिवतम् ). ऋचा ७ वी.- इह = अस्मिन्यज्ञे. प्रयाणं गमनं. वां= युवयोः, तुमचें विमोचनं=अश्वानां विमोचनं, अवांचे रथापासून विमोचन. एकाच अर्थानें -“ इह " हा शब्द या ऋचेत दोनदा वापरला आहे. त्यांतील उद्देश आदर दर्शित करणें हा आहे, ह्मणून हा दोष मानूं नये. " इह " शब्दस्य पर्यवसाने एकार्थत्वेपि आदरार्थत्वात् अविरोधः वां सोमपीतये= तुह्यांला सोमपान करण्यास अवधि सांपडावा ह्मणून.