पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ ऋचा ४ थीः-- हिरण्यवन्धुरं = हिरण्मयनिवासाधारकाष्टोपेतं, ज्या [ रथाच्या ] सारथि बसण्याच्या जागेच्या फळ्या सोन्याच्या आहेत अशा रथाचें विशेषण. स्वध्वरं=शोभनाध्वरवन्तं. हें रथाचें विशेषण. " चांगल्या यज्ञा [ कडे जाण्या] करितां तयार केलेला " अथवा " स्वध्वरं " हैं रथाचें विशेषण न समजतां हैं एक स्वतन्त्रच नाम समजावें व त्याला “ आस्थाथः " ह्या क्रियाप- दाचें कर्म करावें. आस्थाथा हि-आस्थितौ खलु. दिविस्पृशं = युलोकस्पर्शिनं, चुलोकाला स्पर्श करणारा. हैं रथाचे विशेषण. ह्या ऋचेचे दोन अर्थ होतात, ते असे. - १ मराठी अर्थ - सोन्याची आहे वन्धुरा ज्याची (हिरण्यवन्धुरं ), चांगल्या यज्ञांकडे [ कडे जाण्या] करितां जो तयार केला आहे (स्वध्वरं ) [व] जो द्युलोकाला स्पर्श करील [ एवढा मोठा आहे ] (दिविस्पृशं ) अशा रथामध्यें ( रथं ) खरोखर (हि) हे इन्द्रवायू ! [ तुह्मी ] बसलां आहांत ( आ- स्थाथः=आस्थितौ ). [ तर तुझी आतां आमच्या यज्ञाप्रत या. ] २ मराठी अर्थ - सोन्याची ज्याची वन्धुरा आहे (हिरण्यदन्धुरं ) [व] जो द्युलोकाला स्पर्श करील [ एवढा मोठा आहे ] (दिविस्पृशं ) अशा रथामध्ये (रथं) खरोखर (हि) हे इन्द्रवायु ! [ तुह्मी ] बसला आहात ( आस्थाथः = आ- स्थितौ ) [ आणि तुह्मी आमच्या ] चांगल्या यज्ञाप्रत ( स्वध्वरं ) आलां आहांत ( आस्थाथः=आस्थितौ ). ऋचा ५ वी - पृथुपाजसा = प्रभूतवलेन, हैं रथाचें विशेषण. दाश्वांसं दातारं यजमानं. इह=अस्मिन्यज्ञे. आगतम् आगच्छतम्.