पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नः – ह्याचा अन्वय व सुतस्य त्याबरोबर करावा. "नः सुतस्य "= " अस्मदीयं सोमं. " अभिष्टिभिः=अभितः एषणीयैः कामैर्निमित्तभूतैः. त्याच्यापुढे " आगच्छ' - हें अध्याहृत घ्यावें.. " नियुत्वान् = नियुद्भिः तद्वान् नियुत् ह्म० अश्व ते ज्याचे जवळ आहेत तो नियुत्वान्. इन्द्रसारथिः = इन्द्र सहाय: सन्. सुतस्य सुतं, अभिषुतं सोमं पिळून काढलेला सोमरस. तृम्पतम् = पिबतं. , मराठी अर्थ - हे वायो ! ज्याच्या जवळ अश्व आहेत असा जो [ तूं ] तो इन्द्राचा साहाय्यकारी होत्साता ( इन्द्रसारथिः = इन्द्रसहाय: सन् ) [ आमच्या ] ज्या अनंत कामना त्या [ पूर्ण करण्याच्या ] निमित्तानें ( शतेन अभिष्टिभिः ) [ आमच्याकडे ये; व आल्यावर ] आह्मी पिळून काढलेला जो [ हा सोमरस ] त्याचें ( नः सुतस्य ) प्राशन कर ( तृम्पतम् ). ऋचा ३ री:-- न्यवचनः वां युवां, तुह्माला. सहस्रं हरयः सहस्र संख्याकाः अश्वाः अत्र " हरि " शब्दः अश्वसामा अभि= [ अन्ना ] कडे. ह्याच्या पुढे "त्वरयन्तः सन्ति " हें अध्याहृत घ्यावें. प्रयः =अनं. वहन्तु=आवहन्तु. मराठी अर्थ -- हे इन्द्रवायूहो ! सहस्र अश्व ( सहस्रं हरयः ) तुह्माला ( वां ) [ हवीरूप ] अन्नाकडे ( प्रय: अभि ) [ त्वरेनें आणीत आहेत ]. [ तर ते तुम्हांला ] सोमपानाकरितां (सोमपीतये ) घेऊन येवोत ( वहन्तु आवहन्तु ).