पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० चोहोकडे प्रवेश करिता झाला. (आविवेश ). मित्रावरुणांची प्रभारूप ( माया ) जी उषा ती सुवर्णाप्रमाणें ( चन्द्रेव ) बहुत प्रदेशांमध्ये ( पुरुत्रा ) [ आपली ] प्रभा ( भानुं ) पसरते ( विदधे ). मंडल ४ सूक्त ४६. ( पीटर नं. ९ ). ऋचा १ ली:- अग्र= इन्द्रादिभ्यः पूर्वे, इन्द्रादि देवांच्या पूर्वी. मधूनां=मधुररसानां सोमाना. सुत=अभिषुतं रसं. · दिविष्टिषु = दिवः स्वर्गस्य प्रापकेषु यज्ञेषु यद्वा अस्माकं दिवः स्वर्गस्य एषणेषु निमत्तेषुः स्वर्ग प्राप्ति करून देणारे अथवा आह्मी स्वर्गाला जाण्यास निमित्तभूत असे जे यज्ञ त्यांमध्ये. त्वं हि त्वं खलु, हिशब्दः प्रसिद्धियोतनार्थः. मराठी अर्थ --हे वायो ! मधुर आहे रस जीचा अशी जी [सोमवली तिचा (मधूनां ) पिळून काढलेला जो [ रस ] ( सुतं ) तो [ तूं, इतर देवांच्या ] अगोदर ( अ ), पी (पिव ). [ कारण ] स्वर्गप्राप्ति करून देणारे अथवा [ आह्मांला ] स्वर्गाप्रत जाण्यास निमित्तभूत असे (दिविष्टिषु ) [ जे यज्ञ ] त्यां- मध्ये पूर्वपान करण्याचा अधिकार खरोखर तुझा आहे (त्वं हि पूर्वपा असि ). ऋचा २ री:-- अवघड आहे. शतेन=अपरिमितैः. ह्याचा अन्वय “अभिष्टिभिः " ह्याबरोबर आहे. शतेन अभिष्टिभिः= अपरिमितैः कामैः निमित्तभूतैः [ आमच्या ] ज्या शेंकडो इच्छा (अभिष्टि), त्या पुरविण्याच्या हेतूनें.