पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुयमास: सुष्ठु नियन्तुं शक्याः. पृथुपाजसः प्रभूतबलयुक्ताः. ४४ मराठी अर्थः- हे उषोदेवि ! जी [तूं] मरणधर्मरहित आहेस ( अमर्त्या), जिचा रथ सुवर्णमय आहे ( चन्द्ररथा ), [आणि] जी [ तूं ] प्रिय परंतु सत्य अशीं भाषणे करितेस अशी [जी तूं ती, सूर्यकि- रणांच्या योगानें, ] अधिकच दीप्तिमान हो ( विभाहि ). ज्यांचें बल फार मोठें आहे ( ये पृथुपाजसः ) असे अश्व - कीं ज्यांचे नियमन [तुला ] सुलभ रीतीनें करितां येतें ( सुयमासः ) [ व ह्मणून जे तुझ्या रथाला जोडले आहेत ] ते अश्व - हिरण्यवर्णा जी तूं त्या तुला घेऊन येवोत ( आवहन्तु ). ऋचा ३ री:- प्रतीची = प्रति आभिमुख्येन अञ्चति प्राप्नोति इति प्रतीची. भुवनानि=भूतजातानि. विश्वा= सर्वाणि. विश्वा भुवनानि प्रतीची=सर्वाणि भूतजातानि आभिमुख्येन प्राप्नोति सा सर्वभूतसमुदायाला अभिमुख होईल अशा रीतीनें आगमन करणारी. ऊर्ध्वा तिष्ठसि = [ नभसि ] उन्नता तिष्ठसि अमृतंस्य = मरणधर्मरहितस्य सूर्यस्य. केतुः = प्रज्ञापयित्री, [ सूर्याच्या आगमनाचें ] ज्ञान करविणारी. समानं= एकं. अर्थ = मार्ग. अर्थ्यते गम्यते यस्मिन् इति अर्थो मार्गः . चरणीयमाना= चरितुमिच्छन्ती. चक्रमिव= यथा [ नभसि चरितुः सूर्यस्य ] रथांगं पुनः पुनरावर्तते तद्वत्. नव्यसि = [ पुन: पुनर्जायमानतया ] नवतरे. हें उषेचें विशेषण असून संबोधन आहे.