पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ अनु व्रतं चरसि = यज्ञकर्म अभिलक्ष्य चरसि यष्टव्यतया वर्तसे, यज्ञ कर्माना अनुलक्षून वर्ततेस म० यज्ञाचा मान घेण्यास योग्य आहेस. विश्ववारे= विश्वैः सर्वेर्वरणीये. पहिल्या दोन चरणांचे दोन अर्थ होतात. १ मराठी अर्थ - हे धनवति ( मघोनि ) [व] अन्नदातृत्वाचे योगानें भन्नवती [असें नांव पावणारे ] उषे ( वाजेन वाजिनि उषः ) अतिशय ज्ञानसंपन्न अशी [ जी तूं ती, तुझें] स्तवन करणारा [ जो मी त्या माझे ] ( गुणतः ) स्तोत्राचा ( स्तोमं ), स्वीकार कर ( जुषस्व ).. २ मराठी अर्थ - हे धनवति ( मघोनि ) [ व ] अन्नवति ( वाजिनि ) उषे ! अतिशय ज्ञानसंपन्न अशी ( प्रचेताः ) [ जी तूं ती, तुझें ] स्तवन कर णारा [ जो मी त्या माझे ] ( गृणतः ) स्तोत्राचा ( स्तोमं [ ह्या हवीरूप [ अ- शासह ( वाजेन ), स्वीकार कर ( जुषस्व ). अन्तिम दोन चरणांचा मराठी अर्थ - हे सर्वांना प्रिय असे देवि ( विश्ववारे देवि ) ! पुरातन [ असतांनाही ] तरुणीप्रमाणें जी सुन्दर दिसतेस ( पुराणी युवति: [ आणि ] जिच्या संबंधानें स्तवनरूप कर्मों पुष्कळ झालेली आहेत पुरन्धिः ) अथवा जिची शोभा प्रेक्षणीय आहे ( पुरन्धिः = शोभमाना ) अशी [ जी तूं ती ] यज्ञाच्या मानाला योग्य आहेत ( अनुव्रतं चरसि ). ऋचा २ री:- अमर्त्य = मरणधर्मरहिता. विमाहि= [ सूर्यकिरणसम्बधात् ] विशेषेण दीप्यस्व. चन्द्ररथा=सुवर्णमयरथोपता. सूनृताः प्रियसत्यरूपाः वाचः, जी सत्य असून गोड आहेत अशी भाषणे. ईरयन्ती = उच्चारयन्ती. त्वा=त्वां.