पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ इष्टताः - इष्टानि कल्याणानि व्रतानि कर्माणि याभिः सिध्यन्ति ताः. त्याचा ह्या पदाबरोबर विशेषण त्या नात्यानें आहे. अन्वय " इषः अक: = करोति, ददातीत्यर्थः मराठी अर्थ - [ पुण्यकर्माच्या योगानें ] जे तेजस्वी दिसतात अशा ( देवेषु ) लोकांमध्यें [ ही ] ( आयुषु ) जो कोणी [ स्वतः] बर्हि ह्म० कुश ज्यांच्या योगानें कल्याणकारण अशी कर्मे सिद्धीस जातात अशीं ( इष्टव्रता: ), अन्नें ( इषः ) देतो ( अक: =करोति, ददाति ). कापतो त्या मनुष्याला ( वृक्तबर्हिषे जनाय ) मित्र हा, ऋचा १ ली:- मंडल ३ सूक्त ६१. ( पीटर नं. ८ ) वाजेन - हा शब्द दोन तऱ्हेने लावितां येतो. (१) अन्नेन. ह्या अर्थी “ वाजेन वाजिनि ” असा अन्वय करावा. वाजेन वाजिनि = अन्नेन अन्नवति. (२) हविर्लक्षणेन अन्नेन सह, हवीरूप अन्नासह, ह्याचा अन्वय " स्तोमं जुषस्व " ह्याबरोबर करावा. प्रचेताः = प्रकृष्टज्ञानवती. स्तोमं = स्तोत्रं. गृणतः=[ तव ] स्तोत्रं कुर्वतः स्तोतु:. मघोनि=धनवति. पुराणी = पुरातनी. , युवतिः = तरुणी ही उपमा आहे. “ तरुणीप्रमाणें सुन्दर दिसणारी असा ह्या शब्दाचा अर्थ घ्यावा. पुरन्धिः = पुरु बहु धीः स्तोत्रलक्षणं कर्म यस्याः सा शोभमाना वा.