पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ ऋचा ८ वी :- पंच जनाः = निषादपञ्चमाश्चत्वारो वर्णाः, ब्राह्मणादि चार वर्ण व निषा- दांचा पांचवा वर्ण मिळून एकंदर पांच वर्ण. येमिरे - हवींषि उद्यच्छन्ति. अभिष्टिशवसे= [ शत्रूणां ] अभिगन्तृबलयुक्ताय, [ शत्रूंवर ] चाल करून जाण्याजोगें ज्याचें सामर्थ्य आहे अशा. हें मित्राचें विशेषण आहे. विश्वान् सर्वान् . बिभर्ति = [ स्वस्वरूपतया ] धारयति. मराठी अर्थ - [ शत्रूंवर ] चाल करून जाण्याजोगें ज्याचे सामर्थ्य आहे अशा ( अभिष्टिशवसे ) मित्राला पांचही वर्णाचे लोक ( पंच जनाः ) हवि देतात ( येमिरे=हवींषि उद्ययच्छन्ति ). तो [ श्रेष्ठ आदित्य ] सर्व देवांचें भरण ० पोषण करितो ( विश्वान् देवान् विभर्ति ). ऋचा ९ वी:.- मित्रः = भगवान् आदित्यः. ८८ देवेषु=द्योतमानादिगुणयुक्तेषु. ह्याचा आयुषु " ह्या पदाबरोबर विशे- पण ह्या नात्यानें अन्वय आहे. आयुषु = मनुष्येषु [ मध्यें ], मनुष्यांमध्यें . वृक्तबर्हिषे=वृक्तं लूनं बर्हिः येन सः वृक्तबाईः लवनासादनपूर्व हविषो दाता ऋत्विगित्यर्थः, तस्मै वृक्तबर्हिषे. कापले आहेत वर्हि ह्म० कुश ज्यानें तो बृक्तबर्हि, त्याला. मित्राला नुसता हवीच देऊन उपयोग नाहीं तर कुश अथवा दर्भही आपणच कापावेत आणि स्वतः जाऊन आणावेत द्मणजे त्यांत जास्ती श्रेय आहे असा भावार्थ आहे. इषः = अन्नानि.