पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका ऋचेचे दोन दोन अथवा तीन तीनही अर्थ करितां येतात असे भाष्यांत सांगितले आहे, तेथें तितकेही अर्थ मराठीत करून दाखविले आहेत. जेथें एकदम सर्व ऋचेचा अर्थ लिहिल्यास घोंटाळा उडून जाईल असे वाटले तेथे चरणाचरणाचा अर्थ निरनिराळा लिहिला आहे. अशी मूळ पुस्तकाची व्यवस्था आहे. त्यावरून भाष्यांतील अर्थ अल्प श्रमानें पण स्पष्ट रीतीनें विद्यार्थ्यास समजेल असे वाटतें. एकदा सायणांचा अर्थ पूर्णपणें मनांत उतरला ह्मणजे यूरोपिअनांचे मतभेद लक्षांत ठेवणें हें कांहीं फार अवघड नाहीं. कारण मूळ एक अर्थ लक्षांत असला ह्मणचे अमुक ग्रंथकारांचें ह्यावर असें ह्मणणें आहे हें सहज रीतीनें समजतें.
 ह्या पुस्तकास जी परिशिष्टें जोडली आहेत त्यांविषयीं येथे कांहीं निराळें लिहिण्याची अवश्यकता आहे असे दिसत नाहीं. एका परिशिष्टांत, संहितेवरून पदपाठ करण्याचा सराव व्हावा ह्मणून कांहीं अवघड अवघड अशा निवडक ऋचा प्रथम देऊन नंतर पुढे त्यांचा पदपाठ दिला आहे. परंतु पदपाठावरून संहिता करण्याचे कामही ह्या परिशिष्टांचा उपयोग करून घेता येईल असे वाटतें.
 स्वरासंबंधानें व वृत्तांसंबंधानें जी परिशिष्टे आहेत ती माझ्या एका विद्वान स्नेह्यांच्या हातची आहेत हेही येथे कळवून ठेवणे अगत्याचें आहे.
 वेदाच्या संहितेचे विभाग दोन प्रकारांनी करण्याची पद्धति आहे. त्याच तत्त्वावर ऋक्संहितेचेही, आठ अष्टकें अथवा दहा मंडलें, असे विभाग आहेत. आठ अष्टकें ह्मटलीं काय अथवा दहा मंडले ह्मटलीं काय, ग्रंथांमध्ये कांहीही फरक नाहीं. कोणत्याही विभागपद्धतीचा अंगीकार केला तरी मूळ ग्रंथ जेवढा आहे तेवढाच असावयाचा. तथापि "रघुवंशा" ची श्लोकसंख्या कायम ठेविली परंतु जर त्याचे १९ सर्ग न समजतां सव्वीस सर्ग समजले तर प्रत्येक सर्गामध्ये जसा थोडाबहुत फरक करावा लागेल, ह्मणजे पहिल्या सर्गातले कांहीं श्लोक दुसऱ्यांत, दुसऱ्याचे xxxxxसें करावें लागेल, तसाच प्रकार कांहीं अंशी