पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋग्वेदाची संहिता छापलेली आहे. त्या ग्रंथाचे एकंदर नऊ भाग आहेत. त्याचा उपयोग हें पुस्तक तयार करण्याचें काम मुख्यत्वें केला आहे. डा. पीटर्सनच्या ऋग्वेदाच्या प्रतीचाही पुष्कळच उपयोग झाला. तुकारामतात्यांच्या व पीटर्सनच्या प्रतींमध्ये सायणभाष्यासंबंधानें कोठें कोठें फरक आहे. तो त्या त्या स्थली सांगितलेला आहे; परंतु सांगितला नाही अशीही बरींच स्थळे आहेत. त्या ग्रंथकारांचे ह्या स्थली अर्थात्च आभार मानिले पाहिजेत.
 ह्या पुस्तकाची व्यवस्था येणेप्रमाणे आहे.- प्रथमतः प्रत्येक ऋचेंतील सर्व कठिण शब्द एकाखालीं एक असे दिले आहेत. त्यामुळे कोणताही शब्द फार लवकर ध्यानांत येतो. त्या शब्दाच्या पुढेंच त्या शब्दाचें भाष्यामधील संस्कृत स्पष्टीकरण देऊन जरूर वाटले तेथें मराठी अर्थ दिलेला आहे. कठिण स्थली शब्दांचा परस्परसंबंध सांगितलेला आहे. कोठें कोठें अन्वय दिलेला आहे व "नु" "इत्" इत्यादिकांचा अर्थ नीट लक्ष्यांत यावा ह्मणून जाड्या टैपाची योजना केली आहे. त्याचप्रमाणे यौगिक अर्थ (root-meaning) समजण्याकरितां व व्याकरणविशेष दर्शविण्याकरितांही जाडा टैप घातलेला आहे. ह्यापुढे ह्यानंतर त्या ऋचेचा सरळ शब्दशः मराठी अर्थ दिलेला आहे. अर्थ देतांना मराठी भाषा चांगली लिहिण्यापेक्षां त्या ऋचेचा अर्थ बरोबर रीतीनें वाचणाऱ्यांच्या मनांत कसा उतरेल इकडे विशेष लक्ष्य पोंचविले आहे. त्याच कारणानें पुनरुक्तीच्य दोषाचा आनंदानें स्वीकार केला आहे. मराठी अर्थात व इतरत्रही दोन प्रकारच्या कंसांचा उपयोग केलेला आहे. मुळांतील कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ केला हे दाखविण्याकरितां ( ) अशा कंसांत मुळांतील शब्द घातले आहेत, व जेथें नीट अर्थ जुळण्याकरितां कांहीं शब्द पदरचे घालावे लागले तेथे ते शब्द [ ] अशा कंसांत घातले आहेत. त्यामुळे मुळांतील किती व पदरचें किती ह्याविषयीं विद्यार्थ्यांना नीट कल्पना होईल. [ ] अशा कंसांतील शब्द बहुतकरून सायणाचार्याच्य xxxx लच आहेत. जेथें,