पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ [ व सर्व जगाचा ] निर्माता जो हा मित्र तो उगवला ( अयं मित्रः अजनिष्ट ). [ इतक्या गुणांनी जो युक्त आहे व ] जो यज्ञ करण्यास योग्य आहे त्याच्या ( तस्य यज्ञियस्य ) अनुग्रह बुद्धीचे ठायीं ( सुमतौ ) आणि कल्याणकारक अशा त्याच्या उदार मनाचें ठायीही ( भद्रे सौमनसे अपि ), [ यजमान जे ] , [सर्व] वास करूं ( स्याम = भवेम ). ऋचा ५ वी:- नमसा =नमस्कारेण, उपसद्यः=सर्वैरुपसदनीयः. यातयज्जनः=[ प्रातः प्रातः स्वस्वकर्मणि ] प्रवर्तनीयाः जनाः येन सः. गृणते स्तोत्रं कुर्वते जनाय. एतत् - ह्याचा अन्वय " हविः " ह्या पदाबरोबर. पन्यतमाय= स्तुत्यतमाय. जुष्टं प्रीतिविषयं. मित्राय = आदित्याय. आजुहोत- जुहुत. मराठी अर्थः- जो [ आदित्य ] फार श्रेष्ठ आहे ( महान् ), [ अगो- दर ] नमस्कार करूनच ( नमसा ) ज्याच्या समीप जाणे योग्य आहे ( उप- सद्यः), जो [ प्रतिप्रातःकाळी सर्व ] लोकांना [ आपापल्या कर्तव्याच्या ठायीं ] प्रवृत्त करितो ( यातयज्जनः ) तो आदित्य [ आपलें ] स्तवन करणाऱ्या [ भक्ताला ] . ( गृणते ) उत्तम सुखाचा दाता अथवा सुखसेव्य आहे ( सुशेवः ). अशा त्या ( तस्मै ) अतिशय स्तुत्य अशा ( पन्यतमाय ) मित्राकरितां ह्म० आदित्या- करितां, त्याला प्रिय असा ( जुष्टं = प्रीतिविषयं ) हा हवि ( एतत् हविः ) अमी- म (अग्नौ ) द्या ( आजुहोत. )