पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ मराठी अर्थ - रोगवर्जित होणारे (अनमीवासः ), अन्न मिळाल्यामुळे आनन्दित होणारे (इळया मदन्त: ), [ सूर्योपासने करितां त्याच्या पुढें ] गुढघे टेकणारे ( मितज्ञवः = मितजानुका: ), पृथिवीच्या ( पृथिव्याः ) विस्तीर्ण प्रदेशावर ( वरिमन् ) मर्जीप्रमाणे ( आ ) [ सर्वत्र भ्रमण करणारे, ]व आदित्यसंबंधी व्रताच्या समीप राहणारे ( आदित्यस्य व्रतं उपक्षियन्तः ) ० आदित्यसंबंधीं यागादि कर्मे करणारे, असे जे आह्मी, ते मित्राच्या हा० आदित्याच्या (मित्रस्य ) अनुग्रहबुद्धीचे ठायीं ( सुमतौ ) वास करूं ( स्याम = वर्तेमहि ). ऋचा ४ थी :-- नमस्यः=सर्वैर्नमस्करणीयः. सुशेवः = शोभनसुखः, सुखेन सेव्यः इत्यर्थ. राजा=[ सर्वस्य जगतः प्रकाशप्रदानेन ] स्वामी. सुक्षत्रः = शोभनबलोपेतः. क्षत्रशब्देन बलं उच्यते. अजनिष्ट= प्रादुरभूत, उगवला. वेधाः=[ सर्वस्य जगतो ] विधाता. तस्य=एवंविधगुणोपेतस्य तस्य सूर्यस्य. वयं = वयं यजमाना:. सुमतौ शोभनायां बुध्यां. यज्ञियस्य = यज्ञार्हस्य. भद्रे कल्याणकारिणि, सौमनसे==सौमनस्ये. स्याम=भवेम. मराठी अर्थ - सर्वांनी नमस्कार करण्यास योग्य ( नमस्यः ), ज्याच्यापासून उत्तम सुख प्राप्त होतें अथवा ज्याची सेवा सुखकारक आहे. ( सुशेवः), [ सर्व जगाचा ] स्वामी (राजा), चांगल्या बलानें युक्त (सुशेवः)