पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ ८८ " मराठी अर्थ - हे मित्रा! आदित्या ! जो (य: ) [ मनुष्य ] यज्ञ- युक्त होत्साता (व्रतेन युक्त:- ह्यापैकी 'युक्तः हे आध्याहृत आहे ) तुला [ हवीरूप अन्न ] देतो ( ते शिक्षति ), तो मनुष्य ( स मर्तः ) अन्नानें युक्त हो ( प्रयस्वान् प्रास्तु ) ह्म० त्याला पुष्कळ अन्न प्राप्त होवो. तूं ज्याचें रक्षण केलें आहेस अशा [ मनुष्याला] ( त्वोतः ) कोणाकडून बाधा [ ही ] होत नाहीं [ व ] त्याचा कोणाकडून पराभव [ ही ] होत नाहीं ( न हन्यते न जीते ). [ तुला ज्यानें हवि दिला आहे ] त्या [पुरुषाला ] जवळून ( अंतितः अथवा लांबूनही ( दूरात् ) पातक (अंहः ) स्पर्श करीत नाहीं (न अश्नोति =न प्राप्नोति ). ऋचा ३ वीः घ्यावें. अनमीवासः = रोगवर्जिताः. इळया = अन्नेन. मदन्तः=माद्यन्तः. मितज्ञवः = मितजानुकाः. आ= यथाकामं [ सर्वत्र गच्छन्तः ] “सर्वत्र गच्छन्तः " हें अध्याहृत पृथिव्याः वरिमन् = पृथिव्याः विस्तीर्ण प्रदेशे. व्रतं कर्म. उपक्षियन्तः समीपे निवसन्त:. आदित्यस्य व्रतं उपक्षियन्तः=आदित्य संबंधिनः कर्मणः समीपे निवसन्तः- तदीयं कर्म कुर्वाणाः इत्यर्थः. ह्याचा अन्वय “ वयं " ह्या पदाकडे. मित्रस्य - आदित्यस्य. सुमतौ शोभनायां अनुग्रहबुध्यां स्याम = वर्ते महि.