पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ मराठी अर्थ -- लोक ज्याची स्तुति करितात अथवा जो [ गमन करीत असतांना ] शब्द करितो ( ब्रुवाण: ) असा सूर्य ( मित्र: ), [ शेतकरी वगैरे ] लोकांना, [ कृष्यादि कर्माचे ठायीं ] प्रवृत्त करितो ( यातयति ). मित्र हा [ रृष्टिद्वारा अन्न उत्पन्न करून व यागादि कर्म चालू करवून ] पृथिवी व द्युलोक ह्यांचें ' ( पृथिवीं उत यां ) धारण करितो ( दाधार ). उद्योग करणा-या मनुष्यांना ( कृष्टी: = कर्मवतो मनुष्ययान् ) मित्र हा सर्वत्र अनुग्रहदृष्टीने पहातो ( अनिमिषा अभिचष्टे ). [ तर हैं सर्व ध्यानांत आणून हे ऋत्विजहो ! ] घृतयुक्त असा हवि (घृतवत् हव्यं ) मित्राला द्या ( जुहोत = जुहुत.) ऋचा २री:- मर्तः मनुष्यः. प्रास्तु = प्रभवतु. प्रयस्वान् = अन्नवान्. यः=यो यः = यो मनुष्यः. ते तुभ्यं. शिक्षति = [हविर्लक्षणमन्नं] ददाति शिक्षतिदीनकर्मी व्यत्ययेन परस्मैपदं. व्रतेन यज्ञेन. ह्या शब्दापुढें “युक्त " हें अध्याहृत घ्यावें व " व्रतेन युक्तः यः ते शिक्षति ” असा अन्वय करावा. دو न हन्यते =न बाध्यते. न जीयते =न अभिभूयते. त्वोतः = त्वया रक्षित:. एनं तुभ्यं हविर्दत्तवन्तं पुरुषम्. अंहः पापं . न अस्नोति न प्राप्नोति. अन्तितः समीपात्.