पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ खरोखरच [ वर्णन केल्याप्रमाणे ] आहेस. [ तूं नाहीस असें मानणें हें योग्य नाहीं ]. आह्मी, तुला प्रिय, व उत्तम पुत्र पौत्रादिकांनी युक्त असे ( सुवीरासः ), होत्साते सदोदित (विश्वह) तुझें स्तोत्र ( विदथं ) गात जाऊं ( आवदेम= ब्रूयाम ). ह्या सूक्ताविषयीं निरनिराळ्या कथा येणेंप्रमाणे आहेत. - (१) बृहद्देवता - आपल्या तपः सामर्थ्यानें गृत्समद ऋषींनीं इन्द्ररूप धारण केलें. तेव्हां धुनि आणि चुमुरि ह्या दैत्यांना ते इन्द्रच आहेत असें वाटून त्या ऋषींचा वध करण्यास ते दैत्य प्रवृत्त झाले. त्यांचा आशय जाणून ऋषींनीं हैं इन्द्राचें वर्णन केलें. ( २ ) इन्द्र वैन्ययज्ञाला गेला होता. गृत्समद ऋषिही तेथे आले होते, व इन्द्रवधाच्या इच्छेनें दैत्यही तेथे जमले होते. दैत्यांना पाहून इन्द्र गृत्समदांचें रूप धारण करून निघून गेला. नंतर वैन्यानें पूजा केल्यावर ऋषिही यज्ञवाटा- बाहेर आले. त्यांना इन्द्र समजून दैत्य त्यांच्यावर चाल करून आले असतां मी इन्द्र नव्हे असें सांगण्याकरितां ऋषींनी हें सूक्त झटलें. ही कथा कोठील आहे हे सायणाचार्यानीं लिहिलें नाहीं. (३) महाभारत --गृत्समदांच्या यज्ञाकरितां इन्द्र आला होता. तों, तो एकटा आहे असें पाहून, त्याला दैत्यांनी वेढिलें. परंतु इन्द्र ऋर्षांचें रूप धारण करून निघून गेला. इतका वेळ इन्द्र काय करतो आहे ह्मणून दैत्य आंत शिरले. आंतमध्ये गृत्समद होते. दैत्यांना वाटलें की ऋषि तर पूर्वीच निघून गेले आणि इन्द्रानेच हे ऋषींचे रूप घेतलें आहे. तेव्हां मी इन्द्र नव्हे हें सांगण्याकरितां ऋषींनी हें सूक्त ह्यटलें.