पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ मराठी अर्थः- हे असुरहो ! जो सोमरस पिळतो ( सुन्वन्तं ), जो [ पुरोडाशादि हवींचा ] पाक करितो ( पचन्तं ) ह्म० जो ते शिजवून तयार करितो, जो आपल्या रक्षणाकरितां (ऊती) [ शस्त्रांची ] स्तुति करितो ( शंसन्तं ) व जो [ इन्द्राचें ] स्तोत्र गातो ( शशमानं ) त्या सर्वांचें जो [ इन्द्र ] रक्षण करितो; ज्याचें स्तोत्र (ब्रह्म) अभिवृद्धीचें कारण आहे (वर्धनं), ज्याचा ० ज्यास अर्पण केलेला सोम [ ही ] अभिवृद्धीचें कारण आहे व ज्याचें ह्म० ज्यास अर्पण केलेलें हैं [ पुरोडाशादिरूप ] अन्न [ ही ] अभिवृद्धीचें कारण आहे तो इन्द्र होय. ऋचा १५ वीः- - दुधः = दुर्धरः सन्. वाजं अन्नं बलं वा. आदर्दर्षि भृशं प्रापयसि. सत्यश्चित् असि यथार्थभूत एव असि, न पुनर्नास्तीति बुद्धियोग्योऽसि किलेति प्रसिद्धौ. पीटर्सनच्या प्रतीत " चित्" हें टीकेमध्ये गाळले आहे. विश्वह=सर्वेषु अहःसु. सुवीरासः=कल्याणपुत्रपौत्राः सन्तः. विदथं-स्तोत्रं. आवदेम= ब्रूयाम. आतां ऋषि इन्द्राला पाहून प्रत्यक्ष भाषण करितात. मराठी अर्थः- हे इन्द्रा ! शत्रूंना दुर्धर असा ( दुधः ) जो तूं, सोमाभि- व करणायांना ( सुन्वते ) व [ पुरोडाशादि हवींचा ] पाक करणा-यांना पुष्कळ वल ( वाजं ) अथवा अन्न ( वाजं ) देतोस ( आदर्दर्षि ) तो तूं