पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ફ્ર ज्या इंद्राने प्रवाही (सप्त ) अशा जलाला (सिन्धून ), त्याचा प्रवाह चालावा ह्मणून ( सर्तवे), मोकळे सोडून दिलें ( अवासृजत् ), अथवा सप्त महानद्यांना (सप्त सिन्धून् ), त्यांचा प्रवाह चालावा ह्मणून (सर्तवे), ज्यानें मोकळें सोडून दिलें (अवासृजत् ); ज्याचें बाहु वज्रासारखें आहेत [ व ह्मणून ] ज्यानें स्वर्गामध्ये चढून वर येत असणान्या ( यामारोहन्तं ) रोहिणासुराचा वध केला ( अस्फुरत् ) तो इन्द्र होय. ऋचा १३ वी :- द्यावा...... पृथिवी - हें द्विवचन इतरातरापेक्षेनें घातलेले आहे. शुष्मात् = बलात्. चित्=अपिच. निचितः सर्वैः निचितः, यद्वा अन्येभ्योऽपि देवेभ्यो ढांग. वज्रबाहुः = वज्रसदृशबाहुः . मराठी अर्थः- शिवाय, ज्याला द्यावा पृथिवी नम्र होतात; आणखी ( चित् ) ज्याच्या सामर्थ्याचें ( शुष्मात् ) पर्वतांना भय वाटतें ( भयन्ते ); जो सोमाचें पान करितो, ज्याचे अंग [ सर्व देवांहूनही ] सुदृढ आहे ( निचितः ) ज्याचे बाहु वज्राप्रमाणे आहेत [व] जो आपल्या हस्तामध्यें वज्र धारण करितो तो हे असुरहो ! इन्द्र होय. ऋचा १४ वी :- शंसतं = स्वरक्षायै शस्त्राणि शंसतं. शशमानं = स्तोत्रं कुर्वाणम्. ऊती = ऊतये, स्वरक्षायै. ब्रह्म = परिवृढं स्तोत्रं. वर्धनं = वृद्धिकरं. राधः = पुरोडाशादि लक्षणं अनं.